Home / महाराष्ट्र / Shiv Sena: शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! 40 स्टार प्रचारक मैदानात; ठाकरेंच्या युतीला उत्तर देण्यासाठी ‘ही’ मोठी नावे जाहीर

Shiv Sena: शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! 40 स्टार प्रचारक मैदानात; ठाकरेंच्या युतीला उत्तर देण्यासाठी ‘ही’ मोठी नावे जाहीर

Shiv Sena Star Campaigners List : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे मुख्य...

By: Team Navakal
Shiv Sena Star Campaigners List
Social + WhatsApp CTA

Shiv Sena Star Campaigners List : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अनुभवी मंत्री, आक्रमक आमदार आणि सुप्रसिद्ध चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.

शिवसेना (शिंदे गट) – ४० स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी:

  1. एकनाथ शिंदे – मुख्य नेते व उपमुख्यमंत्री
  2. रामदास कदम – नेते
  3. गजानन कीर्तिकर – नेते
  4. आनंदराव अडसूळ – नेते
  5. डॉ. श्रीकांत शिंदे – खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते
  6. प्रतापराव जाधव – केंद्रीय मंत्री
  7. डॉ. नीलम गोऱ्हे – नेत्या
  8. मीनाताई कांबळी – नेत्या
  9. गुलाबराव पाटील – नेते व मंत्री
  10. दादाजी भुसे – उपनेते व मंत्री
  11. उदय सामंत – उपनेते व मंत्री
  12. शंभूराज देसाई – उपनेते व मंत्री
  13. संजय राठोड – मंत्री
  14. संजय शिरसाट – प्रवक्ते व मंत्री
  15. भरत गोगावले – उपनेते व मंत्री
  16. प्रकाश आबिटकर – मंत्री
  17. प्रताप सरनाईक – मंत्री
  18. आशिष जयस्वाल – राज्यमंत्री
  19. योगेश कदम – राज्यमंत्री
  20. दीपक केसरकर – प्रवक्ते व आमदार
  21. श्रीरंग बारणे – उपनेते व खासदार
  22. धैर्यशील माने – खासदार
  23. संदीपान भुमरे – खासदार
  24. नरेश म्हस्के – खासदार
  25. रवींद्र वायकर – खासदार
  26. मिलिंद देवरा – खासदार
  27. दीपक सावंत – उपनेते व माजी मंत्री
  28. शहाजीबापू पाटील – उपनेते व माजी आमदार
  29. राहुल शेवाळे – उपनेते व माजी खासदार
  30. मनीषा कायंदे – सचिव व आमदार
  31. निलेश राणे – आमदार
  32. संजय निरुपम – प्रवक्ते
  33. राजू वाघमारे – प्रवक्ते
  34. ज्योती वाघमारे – प्रवक्ते
  35. पूर्वेश सरनाईक – युवासेना कार्याध्यक्ष
  36. राहुल लोंढे – युवासेना सचिव
  37. अक्षय महाराज भोसले – प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
  38. समीर काझी – कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
  39. शायना एन.सी. – राष्ट्रीय प्रवक्त्या
  40. गोविंदा आहुजा – माजी खासदार व अभिनेता

भावना गवळींना डच्चू आणि अंतर्गत चर्चा

या यादीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे आमदार भावना गवळी यांचे नाव वगळण्यात आले आहे. यापूर्वी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचे स्थान निश्चित होते, मात्र महापालिका निवडणुकीच्या ४० जणांच्या यादीतून त्यांना डच्चू मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाने या निर्णयामागे कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली तरी, या बदलामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

युतीवर उपमुख्यमंत्र्यांचा सडेतोड प्रहार

राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड टीका केली आहे. ते म्हणाले की, “लोकशाहीत आघाड्या होणे स्वाभाविक आहे, मात्र काही युती या केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी केल्या जातात.” आज जाहीर झालेली ठाकरे बंधूंची युती ही जनतेच्या हितासाठी नसून केवळ खुर्चीसाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. याउलट आपली महायुती ही विकासाच्या आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर एकत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

निवडणुकीसाठी पक्षाचे नियोजन

हे सर्व ४० स्टार प्रचारक आगामी काळात राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांमध्ये जाहीर सभा, कोपरा सभा आणि थेट जनसंपर्क मोहिमा राबवणार आहेत. गेल्या काही काळातील यशस्वी सरकारी प्रकल्प आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे हा या प्रचार यंत्रणेचा मुख्य उद्देश आहे. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली असून, महापालिकेच्या रणसंग्रमात विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे.

हे देखील वाचा – Raj Thackeray : “भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!”; युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट

Web Title:
संबंधित बातम्या