Home / लेख / वर्षअखेरचा धमाका! iPhone 16e वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; फीचर्स आहेत जबरदस्त

वर्षअखेरचा धमाका! iPhone 16e वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; फीचर्स आहेत जबरदस्त

iPhone 16e Discount Deal : जर तुमचे स्वप्न लेटेस्ट आयफोन घेण्याचे असेल, तर डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी खिशाला परवडणारी...

By: Team Navakal
iPhone 16e
Social + WhatsApp CTA

iPhone 16e Discount Deal : जर तुमचे स्वप्न लेटेस्ट आयफोन घेण्याचे असेल, तर डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी खिशाला परवडणारी डील घेऊन आला आहे. ॲपलने यावर्षी लाँच केलेल्या आपल्या सर्वात स्वस्त म्हणजेच iPhone 16e मॉडेलवर रिटेल दिग्गज ‘विजय सेल्स’ने किमतीचा मोठा बॉम्ब फोडला आहे.

बँक ऑफर्स आणि किमतीतील कपात एकत्र केल्यास, या आयफोनची किंमत चक्क 50 हजारांच्या खाली आली असून ग्राहकांसाठी ही एक ‘लोट लॉटरी’ ठरत आहे.

iPhone 16e वरील भन्नाट डील

iPhone 16e चे 128GB स्टोरेज मॉडेल फेब्रुवारी 2025 मध्ये 59,900 रुपयांना लाँच करण्यात आले होते. मात्र, विजय सेल्सवर सध्या हा फोन 51,490 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर एचडीएफसी (HDFC) बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला थेट 3,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

या ऑफरनंतर फोनची प्रभावी किंमत फक्त 47,990 रुपये इतकी होते. म्हणजेच लाँचिंग किमतीपेक्षा हा फोन सुमारे 11,910 रुपये स्वस्त मिळत आहे. तसेच ग्राहकांसाठी दरमहारी 2,303 रुपयांचा सुलभ ईएमआय (EMI) पर्यायही उपलब्ध आहे.

डिस्प्ले आणि कॅमेरा वैशिष्ट्ये:

  • डिस्प्ले: या फोनमध्ये 6.1 इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो 1200 निट्स पीक ब्राइटनेससह येतो.
  • मुख्य कॅमेरा: फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला आहे, जो उत्कृष्ट फोटो क्लिक करतो.
  • सेल्फी कॅमेरा: व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

परफॉर्मन्स आणि कनेक्टिव्हिटी:

  • प्रोसेसर: वेगासाठी यामध्ये ॲपलचा शक्तिशाली A18 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
  • ऑपरेंटींग सिस्टम: हा आयफोन लेटेस्ट iOS 26 वर काम करतो, ज्यामुळे युजरला नवीन फीचर्सचा अनुभव मिळतो.
  • टिकाऊपणा: धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP68 रेटिंग मिळाले आहे.
  • कनेक्टिव्हिटी: यात 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी (NFC) आणि चार्जिंगसाठी युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

ज्यांना आयफोन 16 सिरीजचा अनुभव घ्यायचा आहे पण बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी ही वर्षअखेरची डील अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

हे देखील वाचा – Hero HF Deluxe: 70 किमीचे जबरदस्त मायलेज! ‘या’ बाईक ग्राहकांची तुफान मागणी; किंमत 60 हजारांपेक्षा कमी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या