Narendra Modi In Church : आज संपूर्ण देशात नाताळचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्रिसमसनिमित्त दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी यावेळी चर्चमध्ये प्रार्थना देखील केली.
Here are some more glimpses from the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption. pic.twitter.com/ta5vTyYEJU
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
दिल्लीतील कॅथेड्रल चर्च हे सर्वात जुन्या चर्चपैकी एक मानले जाते. शिवाय दिल्लीतील सर्वात मोठे चर्च म्हणून देखील या चर्चची ओळख आहे. दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये ख्रिसमसच्या सकाळच्या प्रार्थनेला देखील मोदींनी उपस्थिती लावली. या संधर्भात त्यांनी एक्सला पोस्ट देखील केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत नरेंद्र मोदी यांनी नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात नाताळ नवीन आशा, उबदारपणा आणि दयाळूपणाची सामायिक वचनबद्धता घेऊन येवो. अशी पोस्ट पंतप्रधान मोदींनी एक्सला केली आहे. ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि बंधुता आणेल, असं देखील नरेंद्र मोदींनी सांगितले.

कॅथेड्रल चर्च हे त्याच्या अतिशय सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी याठिकाणी विशेष सजावट देखील केली जाते. संपूर्ण दिल्लीतील लोक प्रभु येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्यासाठी आणि नाताळ साजरा करण्यासाठी या चर्चमध्ये येत असतात. पंतप्रधान मोदींनी याआधी देखील या चर्चमध्ये भेट दिली आहे.
May Christmas bring renewed hope, warmth and a shared commitment to kindness.
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
Here are highlights from the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption. pic.twitter.com/BzvKYQ8N0H
हे देखील वाचा – Raj Thackeray : “भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!”; युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट









