Sanjay Raut Criticized Eknath Shinde : मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत अशी जाहीर घोषणा केली. तर इतर महापालिकेत येत्या काही दिवसात घोषणा होणार आहे. या घाडामोडींमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साहाल सीमा राहिली नाही.
या दोन्ही पक्षांच्या युतीमुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात जोरदार सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. याच पार्शवभूमीवर नेत्यांनची आपसातील चडाओढ देखील पाहायला मिळत आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाचे सत्र सध्या सुरूच आहे. याच निम्मिताने आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महायुतीवर जोरदार टीका केली आहे. ह्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले आहे.
संजय राऊत यांनी स्वतंत्र विदर्भावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी जहरीली टीका केली आहे. महापालिका निवडणूक होऊ द्या, कोणा कोणाची मुलं पळवत हे समोर येईल असा चिमटा देखील त्यांनी काढला आहे.
पुढे ते म्हणतात ठाकरे नसते तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यममंत्री झाला नसता. शिवाय शिवसेना फोडण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा धक्कादायक आरोप देखील त्यांनी यावेळी केला. शिंदे सेनेचा बापच अनौरस असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
भारतीय जनता पक्ष शिंदेंची मुलं पळवणार आहे. कुत्रे पकडण्याच्या जश्या गाड्या असतात अगदी तसेच पिंजरे भाजपने लावले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर कुणाची मुलं, कोण पळवतंय हे सुद्धा समोर येईल, असा टोला देखील संजय राऊत यांनी सत्ताधार्यांना लगावला आहे. तर शिंदेंच्या पक्षाची मुलं ही अनौरस असल्याचे देखील ते म्हणाले. त्यांची स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे तो बापसुद्धा अनौरसच आहे. अशी टीका त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेनेवर केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री
मराठी माणसासाठी गोपीनाथ मुंडे वगळता भाजपाने कधी आवाज उठवला, असा थेट सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे. अधिवेशन काळात बावनकुळे हे स्वतंत्र विदर्भ करणार असे म्हणाले होते. त्याच्याविरोधात फक्त ठाकरे उभे राहिले होते. पण यावर मुख्यमंत्री मात्र काहीच बोलले नाही.
या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंना जाब विचारायला हवा होता. त्यांनी तो जाब विचारला का? आम्ही मराठी माणसासाठी काय केलं, याचा जाब तुम्ही आमहाला काय विचारताय. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झालात. नाही तर तुम्हाला एका छोट्या भागाचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते असा घणाघाती वार देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
हे देखील वाचा – Varsha Gaikwad: ‘ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात घेतले नाही’; मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका









