Sandeep Deshpande News : राज्यात महानगरपालिकांची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. अशातच मुंबईमध्ये “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…! अश्या आशयाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
याच पार्शवभूमीवर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या एक्सवर या संधर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टरबाबत बोलताना संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, काल ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पोस्टर लावले गेले त्याला आज आम्ही उत्तर देत आहोत, मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा संदेश त्यांनी एक्सद्वारे दिला आहे.
याद राखा pic.twitter.com/mRCIraYruW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 25, 2025
ते म्हणतात उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद मुळातच नाही. भारतीय जनता पक्षातील एआय जनरेटर माकडे हे सगळं करत आहेत. हा विषय आता आला कुटून. जाणीवपूर्वक भाजप हे उत्तर भारतीय आणि मराठी वाद तयार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे शिवाय भाजपाला उत्तर भारतीय मत हवी आहेत, म्हणून त्यांचे हे सगळे खेळ सुरु असल्याचे देखील देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.
या शिवाय त्यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया देताना देखील या बॅनरवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात मराठीचा अपमान केलात तर कानशिलात बसणार हे सत्य आहे. जर तुम्ही मराठीचा अपमान कराल तर ‘नही बटोगे फिर भी पिटोगे’ अश्या कठोर पण मिश्किल शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांवर देखील घणाघाती वार केले आहेत. शेलार यांना पक्षात कोण विचारत नसल्याने त्यांना रामदास आठवले चावले आहेत असा टोला देखील संदीप देशपांडेंनी लगावला आहे.
याआधी देखील संदीप देशपांडे यांनी अश्या प्रकारच्या प्रकरणामध्ये आपली मते अनोख्या पद्धतीने मांडत जनतेपर्यंत आपले म्हणे पोहोचवले आहे.संदीप देशपांडे हे त्यांच्या हटके आणि लक्षवेधी वक्तव्यांसाठी अधिक ओळखले जातात.
याआधी त्याची दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन देखील रोख ठोख अशी भूमिका पाहायला मिळाली होती. संदीप देशपांडे हे दादर परिसरात हा टी-शर्ट परिधान करुन फिरत होते. या टी-शर्टवर, ‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!’, असा मजकूर देखील तेव्हा त्यांनी आपल्या टी- शर्ट वर लिहिला होता. हा टी-शर्ट म्हणजे एकप्रकारे मुंबईत राहून मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचे देखील त्यावेळी सांगितले जात होते.
चड्डीत राहायचं pic.twitter.com/oxZkZq1Mui
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 10, 2025
त्यानंतर राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर देखील संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत एक्सला एक पोस्ट केली होती. त्यावेळी ती पोस्ट जोरदार व्हायरल देखील झाली होती. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही..असं स्पष्ट मत देखील त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं होत.
होय,आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही pic.twitter.com/UkIIHr3OuV
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 18, 2025
त्यानंतर त्यांनी निशिकांत दुबेंवर केलेली टीका ती अधिक लक्षवेधी ठरली होती. संदीप देशपांडे यांनी ‘समुद्रात दुबे दुबे करून मारू’ असा मजकूर लिहिलेला एक टी-शर्ट परिधान करून निशिकांत दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त होता.

हा त्यांचा निषेध करण्याचा एक ‘हटके’ आणि लक्षवेधी मार्ग होता, ज्यामुळे त्यांचे ट्विट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातून त्यांनी निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानांना जोरदार प्रत्युत्तर देखील दिले आहे.
हे देखील वाचा – Varsha Gaikwad: ‘ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात घेतले नाही’; मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका








