Home / News / EC’s Condition : शौचालय वापरता का? दाखला द्या ! निवडणूक आयोगाची अजब अट

EC’s Condition : शौचालय वापरता का? दाखला द्या ! निवडणूक आयोगाची अजब अट

EC’s Condition – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना आयोगाने मागितलेला एक अजब दाखला सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘माझ्या...

By: Team Navakal
EC’s Condition
Social + WhatsApp CTA

EC’s Condition – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना आयोगाने मागितलेला एक अजब दाखला सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘माझ्या घरात शौचालय असून त्याचा मी वापर करतो’ असे स्वयंप्रमाणपत्र उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. शहर हगणदारीमुक्त असतानाही असे दाखले मागविले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरताना आयोगाने उमेदवारांकडून एक अजब प्रमाणपत्र मागितले जात आहे. उमेदवार शौचालयाचा वापर कसा करतो. त्याचे स्वयंप्रमाणपत्र उमेदवारांना द्यावे लागणार आहे. घरात शौचालय आहे का? नसल्यास तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो, का याची माहिती आयोगाने मागवली आहे. निवडणूक लढवणे आणि शौचालयाचा वापर करणे याचा काय संबंध, असा सवाल करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे शहरे हगणदारी मुक्त झाल्याचा दावा करता आणि दुसरीकडे असे दाखले मागता याचाच अर्थ शासनाला स्वत:बद्दल विश्वास नाही, असे एक इच्छुक उमेदावर राजेंद्र ढगे यांनी सांगितले. शहरातील सर्वच इच्छुक उमेदवार हे सुशिक्षित आहेत. त्यातील कुणीच उघड्यावर नैसर्गिक विधीला जात नाही. शौचालयाचा वापर करतो असे प्रमाणपत्र देताना संकोच वाटतो असेही काही उमेदवारांनी सांगितले.


हे देखील वाचा-

नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय

नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना

मुंबईतील उत्तर भारतीयांची ओबीसी आरक्षणाची मागणी

Web Title:
संबंधित बातम्या