Home / देश-विदेश / Social Media Policy: भारतीय लष्कराचा मोठा निर्णय! सैनिकांना आता इन्स्टाग्राम वापरण्याची मुभा; मात्र ‘या’ कडक अटींचे करावे लागणार पालन

Social Media Policy: भारतीय लष्कराचा मोठा निर्णय! सैनिकांना आता इन्स्टाग्राम वापरण्याची मुभा; मात्र ‘या’ कडक अटींचे करावे लागणार पालन

Indian Army Social Media Policy : भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल केले आहेत....

By: Team Navakal
Indian Army Social Media Policy
Social + WhatsApp CTA

Indian Army Social Media Policy : भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लष्करी कर्मचाऱ्यांना आता ‘इन्स्टाग्राम’ वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, ही मुभा अत्यंत कडक अटींसह असून केवळ ‘व्ह्यू-ओन्ली’ म्हणजेच फक्त मजकूर पाहण्यापुरती मर्यादित असेल. लष्कराच्या मुख्यालयाने मिलिटरी इंटेलिजन्स विभागातर्फे हे आदेश जारी केले असून त्यांची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने सुरू झाली आहे.

केवळ ‘पॅसिव्ह सहभाग’ राहणार अनिवार्य

लष्कराने स्पष्ट केले आहे की, जवान आणि अधिकारी माहिती मिळवण्यासाठी किंवा जागरूक राहण्यासाठी इन्स्टाग्रामवरील आशय पाहू शकतात. मात्र, याला लष्कराने ‘पॅसिव्ह पार्टिसिपेशन’ असे नाव दिले आहे.

याचा अर्थ असा की, जवानांना व्यासपीठावर केवळ प्रेक्षक म्हणून राहता येईल. कोणत्याही प्रकारचे सक्रिय सहकार्य किंवा संवाद लष्कराने पूर्णपणे निषिद्ध मानले आहेत.

‘या’ गोष्टींवर असणार बंदी:

१. पोस्टिंग आणि शेअरिंग: लष्करी कर्मचारी स्वतःचे फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करू शकणार नाहीत.

२. प्रतिक्रिया देणे: कोणत्याही पोस्टवर कमेंट करणे, लाईक करणे किंवा त्यावर आपली मते व्यक्त करण्यास सक्त मनाई आहे.

३. मेसेजिंग: कोणालाही मेसेज पाठवणे किंवा चॅटिंग करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाईल.

४. गोपनीयता: लष्करी कर्मचारी आपली ओळख किंवा युनिटशी संबंधित कोणतीही माहिती तिथे उघड करणार नाहीत, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीवर सोपवण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव नियमावलीत बदल

लष्कराने यापूर्वी फेसबुक, यूट्यूब आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवरही अशाच प्रकारचे निर्बंध घातले आहेत. परकीय गुप्तचर संस्थांकडून हनी ट्रॅपच्या माध्यमातून सैनिकांना लक्ष्य केले जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. यातून संवेदनशील माहिती फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच डिजिटल युगाशी जुळवून घेताना सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा मध्यममार्ग निवडण्यात आला आहे.

यासोबतच लष्कराने व्हीपीएन (VPN), टॉरेंट वेबसाइट्स आणि अनोळखी वेब प्रॉक्सी वापरण्याबाबत पुन्हा एकदा कडक चेतावणी दिली आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही साधने घातक असल्याचे लष्कराने आपल्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे.

हे देखील वाचा – Devrai Fire : ‘घरावर बॉम्ब पडल्यासारखी अवस्था…’; सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईला भीषण आग; अभिनेत्याने प्रशासनाला झापले

Web Title:
संबंधित बातम्या