Prakash Mahajan : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी आता शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. प्रकाश महाजन ह्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
प्रकाश महाजन यांनी काल शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.दरम्यान, मनसेमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता.
पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला फक्त उपेक्षाच आल्याने देखील प्रकाश महाजन यांनी माध्यमांसमोर उघडपणे जाहीर केले. कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेल्या काही दिवसांपासून मनात येत होती असे देखील त्यांनी त्यावेळी म्हटले होते. कुठल्याही पक्षात राहिलो तरी निवडणुकीचे तिकिट काही वाट्याला येत न्हवते. केवळ हिंदुत्वाचा विचार जगला पाहिजे याकरता पक्षात होतो, असे देखील प्रकाश महाजन त्यावेळी म्हणाले होते.









