Baba Siddique Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party)ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique)हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police)गुन्हे शाखेने आरोपी अमोल गायकवाड याच्याविरोधात सुमारे २०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ३० साक्षीदारांचा समावेश असून अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

आरोपपत्रानुसार (Chargesheet), अमोल गायकवाड आणि फरार आरोपी शुभम लोणकर (Shubham Lonkar) यांच्यात सातत्याने संपर्क होता. पोलीस तपासात गायकवाडने डब्बा कॉलिंग तसेच सिग्नल मेसेजिंग अॅपचा वापर केल्याची कबुली दिली असून, आपले लोकेशन पोलिसांना ट्रॅक करता येऊ नये यासाठी त्याने हे माध्यम वापरल्याचे उघड झाले आहे.

पुण्याच्या वारजे (Warje)परिसरातील रहिवासी असलेला अमोल गायकवाड (Amol Gaikwad) हा या प्रकरणात अटक केलेला २७ वा आरोपी आहे. आरोपपत्रात गायकवाडचे बिश्नोई (Bishnoi)गँगशी कथित संबंध असल्याचेही नमूद केले आहे. तसेच जुलै २०२५ मध्ये पंजाबमधील टेक्सटाईल व्यावसायिक संजय वर्मा (Sanjay Verma) हत्या प्रकरणातही त्याची भूमिका असल्याचा आरोप आहे. शूटरांना (Shooters) आश्रय आणि लॉजिस्टिक मदत दिल्याचा आरोप असून, त्या प्रकरणातील गुह्यातही आता त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा-
नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय
नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना









