Raigad Crime News : रायगडच्या खोपोलीतुन एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. खोपोली (Khopoli) नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची आज सकाळी ७ वाजता निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगी हल्लेखोरांना घटनास्थळाजवळ असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिले असता हे हल्लेखोर काळया रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र मंगेश काळोखे यांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असल्याची माहिती या प्रत्यक्षदर्शीनी दिली.
Khopoli Crime News : मुलाला शाळेतून सोडून घरी परततांना झाला हल्ला
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी या हल्लेखोरांचा तात्काळ शोध घ्याला सुरु केला असून अधिक तपास केला जात आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे, याबाबतीत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक माहितीनुसार, मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना काळोखे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाढवळ्या हत्येच्या प्रकाराने खोपोली शहर हादरले आहे.
मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून सध्या कार्यरत होते. आज सकाळी काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते आणि परतताना त्यांच्यावर काही अज्ञातांना हल्ला चढवत त्यांची निर्घृणपणे हत्या केली आहे. हल्लेखोर हे एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते आणि यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेने खोपोली शहर मात्र चांगलेच हादरले आहे. मात्र या हल्ल्यामागे नेमकं कारण काय? हा हल्ला कुणी केला, या बाबत अधिक खुलासा झाला नाही आहे.









