Home / महाराष्ट्र /  Maharashtra Leopard : ठाण्यात बिबट्याची दहशत! शहरी भागात वावर वाढल्याने नागरिक भयभीत

 Maharashtra Leopard : ठाण्यात बिबट्याची दहशत! शहरी भागात वावर वाढल्याने नागरिक भयभीत

Maharashtra Leopard : राज्यात बिबट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरताना दिसत आहे. आता ग्रामीण...

By: Team Navakal
 Maharashtra Leopard
Social + WhatsApp CTA

 Maharashtra Leopard : राज्यात बिबट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरताना दिसत आहे. आता ग्रामीण भागासोबतच शहरी भागात देखील बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वन्य जीव आणि माणसांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे.

पुणे, अहिल्यानगर, रायगड तसेच भायंदर नंतर आता ठाण्यात बिबट्या दिसल्याने ठाणेकर दहशतीत आहेत. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक २ येथील बेथनी हॉस्पिटलच्या मागील परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वर्तकनगर पोलीस आणि वनविभागा सक्रिय होताना दिसत आहे.

ठाणे वन विभागाचे नरेंद्र मुठे म्हणाले की, घटनेनंतर त्यांनी दक्षता वाढवली आहे आणि परिसरात बिबट्यांची उपस्थिती निश्चित करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. जवळच्या निवासी सोसायटीतील रहिवाशांनाही घाबरू नका असे आश्वासन देण्यात आले आहे आणि जर कोणी हा प्राणी पाहिला तर त्यांना काय नियम पाळावे लागतील याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या