Home / राजकीय / Ghosalkar’s Campaign Posters : घोसाळकरांच्या प्रचार पोस्टरवर पतीचा फोटो ! उबाठाचा आक्षेप

Ghosalkar’s Campaign Posters : घोसाळकरांच्या प्रचार पोस्टरवर पतीचा फोटो ! उबाठाचा आक्षेप

Ghosalkar’s Campaign Posters – तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांनी नुकताच भाजपा प्रवेश केला आहे. तेजस्वी घोसाळकर या प्रभाग क्रमांक २...

By: Team Navakal
Ghosalkar’s Campaign Posters
Social + WhatsApp CTA

Ghosalkar’s Campaign Posters – तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांनी नुकताच भाजपा प्रवेश केला आहे. तेजस्वी घोसाळकर या प्रभाग क्रमांक २ मधून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्यांनी त्या प्रभागात प्रचार (campaigning) सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर दिवंगत पती अभिषेक घोसाळकर (Husband Abhishek Ghosalkar.)यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजपा (BJP) प्रवेश झाला का? असा सवाल शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.८ फेब्रुवारी २०२४ रोजी उबाठाचे (UBT) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते आणि दोन्ही कुटुंबांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या भागातील शिवसैनिक आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आधीच नाराजी होती.

https://www.facebook.com/share/p/1D3tbcocsZ

घोसाळकर कुटुंबाचा पारंपरिक प्रभाग क्रमांक १ यावेळी आरक्षित झाल्यानंतर उबाठाने तेजस्वी यांना प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते आणि त्यांनी तेथे प्रचारही सुरू केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या त्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या वतीने प्रचार करत आहेत.

प्रचाराच्या मजकूरात दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचे छायाचित्र वापरण्यास शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आहे. अभिषेक घोसाळकर जिवंत असते तर त्यांनी कधीही शिवसेना आणि ठाकरे यांना सोडले नसते. त्यांच्या पश्चात त्यांची प्रतिमा भाजपाच्या बॅनरवर (BJP banners) वापरणे योग्य नाही. हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली आहे. संजय राऊत (MP Sanjay Raut)म्हणाले की तेजस्वी घोसाळकर यांनी मोदी , अमित शहा यांचे फोटो लावावे . त्यांचे पती उबाठाशी एकनिष्ठ होते . त्यांचा फोटो त्यांनी वापरू नये.


हे देखील वाचा-

नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात २०० पानांचे पुरवणी आरोपपत्र

मुंबईतील उत्तर भारतीयांची ओबीसी आरक्षणाची मागणी

Web Title:
संबंधित बातम्या