Home / महाराष्ट्र / Municipal Corporation election 2026 : सोलापूर भाजपमध्ये ‘निष्ठावंत पॅटर्न’चा स्फोट! तिकीट नाकारल्यास बंडखोरांचा प्रचार करणार; दोन दिग्गज आमदारांचा उघड इशारा

Municipal Corporation election 2026 : सोलापूर भाजपमध्ये ‘निष्ठावंत पॅटर्न’चा स्फोट! तिकीट नाकारल्यास बंडखोरांचा प्रचार करणार; दोन दिग्गज आमदारांचा उघड इशारा

Solapur Municipal Corporation election 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये...

By: Team Navakal
Municipal Corporation election 2026
Social + WhatsApp CTA

Solapur Municipal Corporation election 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढल्याने जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.

हीच अस्वस्थता आता उघडपणे बाहेर आली असून, भाजपचे दोन दिग्गज आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी ‘निष्ठावंत पॅटर्न’

सोलापूरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुभाष देशमुख तसेच विजयकुमार देशमुख यांनी मिळून ‘निष्ठावंत पॅटर्न’ सुरू केला आहे. या पॅटर्ननुसार, जर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या पाहुण्यांना उमेदवारी दिली, तर गप्प बसणार नाहीत. जर आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला भाजपने तिकीट दिले नाही आणि त्याने महायुतीतील इतर कोणत्याही पक्षातून उमेदवारी अर्ज भरला, तर आम्ही त्याचाच प्रचार करू, अशी आक्रमक भूमिका या दोन्ही आमदारांनी घेतली आहे. निष्ठावंतांवर अन्याय झाल्यास आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, असा इशारा त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.

बाहेरून आलेल्या लोकांकडून निष्ठावंतांच्या मुलाखती

उमेदवारांच्या निवडीसाठी सध्या भाजपकडून सुरू असलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेवर सुभाष देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

जे लोक अवघ्या 15 दिवसांपूर्वी पक्षात आले आहेत, तेच आता वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या मुलाखतींमध्ये इच्छुकांना त्यांची “निवडणूक खर्च करण्याची क्षमता” किती आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. भाजपमध्ये कधीही अशा पद्धतीने पैशांचा विचार करून तिकीट देण्याची पद्धत नव्हती, असे म्हणत देशमुखांनी सध्याच्या पक्षपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर देशमुखांचा आक्षेप

जागांच्या वाटघाटी आणि उमेदवारी निश्चितीबाबत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जागा वाटपाची चर्चा केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत असून, निवडणूक समितीत नेमके कोण आहेत याची माहिती आम्हाला दिलेली नाही, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले.

कोणाशी चर्चा करायची हेच माहित नसल्याने आम्ही चर्चेला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. या वादामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून, याचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा – Municipal Election 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजयाचा विश्वास! राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळतील; आमदार शंकर जगतापांचा मोठा दावा

Web Title:
संबंधित बातम्या