Home / महाराष्ट्र / Sanjay Raut Brother Sandip Raut : राऊत परिवाराची राजकीय ताकद पुन्हा मैदानावर; संदीप राऊतांच्या महापालिका प्रवेशामुळे घराणेशाही चर्चेत

Sanjay Raut Brother Sandip Raut : राऊत परिवाराची राजकीय ताकद पुन्हा मैदानावर; संदीप राऊतांच्या महापालिका प्रवेशामुळे घराणेशाही चर्चेत

Sanjay Raut Brother Sandip Raut : महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत...

By: Team Navakal
Sanjay Raut Brother Sandip Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut Brother Sandip Raut : महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याचे आपण पाहिले. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नसल्यचे चित्र आपल्या डोळ्यापुढे आहेच. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फारसे यश मिळालेली नाही. परंतु, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.

त्यापैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई असल्याचे देखील बोलले जाते. त्यात जागावाटपाचा तिढा अद्यापही असल्याचे बोलले जात आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांचे लहान बंधू संदीप राऊत हे राजकारणात उतरत आहेत. याआधीच संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे २०२४ मध्ये विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार झाले आहेत. आता त्यांचे लहान बंधू देखील राजकारणात उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संदीप राऊत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहेत. विक्रोळीतील १११ नंबर वार्डातून संदीप राऊत निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रचाराचे पोस्टरही आता जारी करण्यात आले आहेत.

तसेच विक्रोळीतील याच वार्ड क्रमांत १११ च्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांमध्ये तिढा असल्याचे देखील समोर आले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत परंतु; आता संदीप राऊत यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वॉर्ड नंबर १११ मधून लढत असल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे आमदार आहेत तर आता त्यांचा दुसरे भाऊ संदीप राऊत देखील पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाही मुद्दा चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

भावाच्या उमेदवारीवर संजय राऊत स्पष्टच बोलले ?
मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. आमच्या युतीत काही अडचण या क्षणी नाही आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आमच्यासोबत असावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमच्या वाट्याच्या जागा त्यांना दिल्या आहे. आमचं नुकसान झालं पण ठीक आहे एवढं चालेल. आमच्या अनेक जागा मनसेला आधीच सीटिंग आहेत.

दुसरीकडे संदीप राऊतबद्दल मला माहिती नाही, असं उत्तर संजय राऊत यांनी दिल. एका वाक्यातच संदीप राऊतांच्या उमेदवारीबाबत विषय संपवण्याचा प्रयत्न केल्याचे यात उघड झाल. पण संदीप राऊत निवडणूक लढणार की नाही याबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे.

याआधी देखील संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलेच चर्चेत आले होते. संजय राऊत यांचे सख्खे भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी मागच्या वर्षात फेसबुकवर एक पोस्ट केली होती. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं देखील दिसून आल होत. मात्र तोपर्यंत संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

पोस्टमध्ये नेमकं म्हटलं काय?
संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्ती केली होती. नेत्यांपुढे पुढं-पुढं करणाऱ्यांनाच पक्षात पद मिळत असल्याचा आरोप संदीप राऊत यांनी आपल्या पोस्टद्वारे केला होता. ही पोस्ट संदीप राऊत यांनी थोड्यावेळेनंतर डिलीट देखील केली होती. परंतु त्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले होते.

त्यानंतर त्यांनी पुढे येत यावर अधिक स्पष्टीकरण देखील दिल ते म्हणाले होते कि माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे ही पोस्ट माझ्या अकाउंटवर दिसली. आता मी रिकव्हर केले असून त्या पोस्टचा माझा काही संबंध नसून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. आणि कोणीही त्याचा विपर्यास करू नये असं संदीप राऊत यांनी म्हटलं होत.

हे देखील वाचा – Municipal Election 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजयाचा विश्वास! राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळतील; आमदार शंकर जगतापांचा मोठा दावा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या