Home / देश-विदेश / PNB Loan Fraud : PNB ला 2434 कोटींचा चुना! बँकेत पुन्हा घोटाळा; RBI ला दिली माहिती

PNB Loan Fraud : PNB ला 2434 कोटींचा चुना! बँकेत पुन्हा घोटाळा; RBI ला दिली माहिती

PNB Loan Fraud : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एका मोठ्या कर्ज फसवणुकीचा खुलासा केला आहे....

By: Team Navakal
PNB Loan Fraud
Social + WhatsApp CTA

PNB Loan Fraud : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एका मोठ्या कर्ज फसवणुकीचा खुलासा केला आहे. ‘श्रेई (SREI) इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड’ आणि ‘श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड’ या कंपन्यांच्या माजी प्रवर्तकांनी बँकिंग प्रणालीची सुमारे 2,434 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती बँकेने रिझर्व्ह बँकेला दिली आहे. या धक्कादायक खुलाशामुळे बँकिंग वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बँकेने दिली सविस्तर माहिती

पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रेई’ समूहाच्या दोन उपकंपन्यांनी हे कर्ज घेतले होते. यामध्ये ‘श्रेई इक्विपमेंट फायनान्स’कडून 1,240.94 कोटी रुपये आणि ‘श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स’कडून 1,193.06 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या संपूर्ण थकीत रकमेसाठी बँकेने आधीच 100 टक्के आर्थिक तरतूद केली आहे, त्यामुळे बँकेच्या ताळेबंदावर याचा तातडीने परिणाम होणार नाही.

काय आहे ‘श्रेई’ समूहाचे प्रकरण?

कोलकाता येथील कानोरिया बंधूंच्या मालकीच्या या कंपन्यांवर गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप झाल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने त्यांचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या कंपन्यांवर एकूण 32,700 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते.

त्यानंतर या कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. डिसेंबर 2023 मध्ये ‘नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ने (NARCL) या कंपन्यांचा ताबा घेतला आहे. 1989 मध्ये सुरू झालेली ही कंपनी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्राला कर्जपुरवठा करणारी मोठी बिगर बँकिंग वित्तीय संस्था होती.

PNB च्या नफ्यात मात्र वाढ

एकीकडे फसवणुकीचे प्रकरण समोर आले असले तरी, पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक कामगिरी सुधारताना दिसत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात 14 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

बँकेचा नफा 4,303 कोटी रुपयांवरून वाढून 4,904 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच बँकेच्या ऑपरेशन्समधून मिळणारा नफाही वार्षिक स्तरावर 5.46 टक्क्यांनी वाढून 7,227 कोटी रुपये झाला आहे.

हे देखील वाचा – India Extradition Fugitives : विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या