Pune News : पुणे महानगरपालिकेत अजित पवारांची (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याची माहिती आता समोर येत आहे. याबाबत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी अधिक स्पष्टता दिली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचे आपापसात बिनसल्याने पुणे महानगरपालिकेत नव्याने शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी लढण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली आहे. भाजपाकडून मान नको मात्र कार्यकर्त्यांचा अपमान देखील नको कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरता वरिष्ठांना कार्यकर्त्याच्या भावना सांगितल्याची माहिती रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिली आहे. दुपारपर्यंत शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.(Ravindra Dhangekar)
धंगेकरांनी यावर अधिक स्पष्टता देत सांगितले कि काल आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनांचा उद्रेक झाला, त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे, फक्त आमच्याच पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान हा मिळायलाच हवा. या हेतूने काल आमचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले, त्यानंतर उदय सामंत यांची देखील भेट घेतली. पुढे आक्रमक होत ते म्हणतात जर पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगतिले.
त्याचबरोबर भाजपने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे, तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजप स्वतः देखील निवडून आलं नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करणार आहोत हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.
पुढे ते सांगतात आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आमच्या पक्षाचे उमेदवार आम्हीच ठरवणार, तर त्याउलट आमचे उमेदवार पण तेच ठरवणार, जागा देखील तेच ठरवणार, असं असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणं अगदीच स्वाभाविक आहे. यासगळ्यामध्ये नेत्यांना तोंड द्यावे लागणार आहे, आम्ही काल एकनाथ शिंदेंना सांगितलं आहे, अशा प्रकारची युती करणे आपल्यासाठी घातक आहे, शेवटी जर आपल्या जागा निवडून येणार नसतील तर, तर आपल्याला युतीचा फायदा काय आहे, त्यापेक्षा आपण आपला निर्णय कार्यकर्त्यांच्या बाजूने घेतला पाहिजे असं त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुचवलं असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने शिवसेनेची बोलण्याची तयारी दर्शवली आहे, शेवटी कार्यकर्त्याच्या भावना या ओळखून पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे देखील धंगेकर म्हणाले.
हे देखील वाचा – India Extradition Fugitives : विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये









