Home / महाराष्ट्र / Dadar Railway Station : मुंबई दादर स्टेशनवर थरारक घटना; तरुणाच्या अंगावरून गेली ट्रेन; दादर स्टेशनवर आमदाराने पुढे केला मदतीचा हात

Dadar Railway Station : मुंबई दादर स्टेशनवर थरारक घटना; तरुणाच्या अंगावरून गेली ट्रेन; दादर स्टेशनवर आमदाराने पुढे केला मदतीचा हात

Dadar Railway Station : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आता अशातच सर्वच राजकीय स्तरावरील नेते मंडळी...

By: Team Navakal
Dadar Railway Station
Social + WhatsApp CTA

Dadar Railway Station : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आता अशातच सर्वच राजकीय स्तरावरील नेते मंडळी कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र या सगळ्या धावपळीमध्ये मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात एक तरुण पाय घसरून रुळावर पडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दादर स्टेशनवर घडलं काय?
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. फेसबुकवर ‘मराठा’ नावाच्या पेजवरुन हि शेअर करण्यात आली आहे. दादर स्थानकावरील ही घटना इतकी भयानक होती की ती अंगावर काटा आणणारी ठरली. दादर-अमरावती रेल्वेने प्रवास करत असताना एका तरुणाचा अचानक तोल गेला आणि तो थेट प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळावर पडला. क्षणभरातच त्याच्यावरून संपूर्ण रेल्वे धडधडत निघून गेली. उपस्थितांचे श्वास तंग झाले, जीवन वाचेल की नाही,अशी आशा क्षणाक्षणाला क्षीण होत होती. मात्र या तरुणाचे दैव बलवत्तर ठरले. तो तरुण एका जागी स्थिर राहिला आणि चमत्कारिकरीत्या मोठ्या अपघातातून बचावला,” असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हा सारा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. पोस्टमध्ये पुढे सांगितले आहे की, ही बाब लक्षात येताच कोल्हापूरकडे जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेससाठी थांबलेले आमदार सतेज पाटील क्षणाचाही विलंब न करता धाव घेऊन पुढे आले. स्वतः पुढे येऊन त्यांनी त्या युवकाला हात देऊन सुरक्षितपणे ओढले. मात्र, मदतीपुरतेच ते थांबले नाही; त्यांनी त्याची विचारपूस केली, कुठे दुखापत झाली आहे का याची चौकशी केली, आणि त्याच्या मानसिक धैर्याला बळ देत त्याला धीर दिला.

क्षणभरात घडलेली ही घटना माणुसकी, धैर्य आणि प्रसंगावधान यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. फोटोमध्ये तरुण प्लॅटफॉर्मवर बसून, तोंडाजवळ हात ठेवून रडताना दिसतो, तर त्याच्या बाजूला उभे असलेले सतेज पाटील त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर देताना स्पष्ट दिसत आहेत. मागील बाजूस प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरवरून हा ठिकाण मुंबई येथील असल्याचे स्पष्ट होते. या दृश्यातून फक्त मदतीचा हातच नाही तर मानवी संवेदना, धैर्य आणि नेतृत्त्व यांचे अमूल्य दर्शन घडते.

सदर प्रसंगानंतर सतेज पाटील यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. या पोस्टखाली अनेकांनी व्यक्त केले की, सतेज पाटील हे लोकांच्या मदतीस तत्पर, धैर्यशील आणि प्रेरणादायी नेतृत्व आहेत. मात्र, या घडामोडीसंदर्भात स्वतः सजेत पाटील यांनी कुठेही, कोणतीही पोस्ट अथवा माहिती सोशल मीडियावर शेअर केलेली नाही.

नेमका हा प्रकार कोणत्या दिवशी घडला हे अद्याप निश्चित झालेले नाही, तरी सोशल मीडियावर हा व्हायरल झाला असून, हजारोंच्या संख्येने लोकांनी या पोसला पसंती आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. घटनाक्रमातील सामाजिक संवेदनशीलता, नेतृत्त्वाची तत्परता आणि मानवी माणुसकी यांचे दर्शन यामध्ये स्पष्ट होते. पोस्टमधील दृश्य एखाद्या सिनेमातील प्रसंगासारखे, जिथे धैर्य, मदत आणि सहानुभूती एकत्र येतात, असे भावनिक प्रभाव निर्माण करते.

( टीप : या प्रकरणाची पुष्टी आम्ही केलेली नाही; याबाबतची अधिकृत पोस्ट सजेत पाटील यांनी केलेली नाही.)

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या