Home / महाराष्ट्र / Bandu Andekar : पोलीस व्हॅनमधून थेट निवडणूक रणांगणात; निवडणूक रणसंग्रामात गुन्हेगारी छाया? आंदेकरांची ‘फिल्मी एन्ट्री’ चर्चेत

Bandu Andekar : पोलीस व्हॅनमधून थेट निवडणूक रणांगणात; निवडणूक रणसंग्रामात गुन्हेगारी छाया? आंदेकरांची ‘फिल्मी एन्ट्री’ चर्चेत

Bandu Andekar : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू...

By: Team Navakal
Bandu Andekar
Social + WhatsApp CTA

Bandu Andekar : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. याच धावपळीच्या वातावरणात पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर टोळीचा म्होरक्या देखील थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज भरण्याची त्यांची एन्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पोलिस व्हॅनमधून करण्यात आलेली ही सिनेस्टाईल एन्ट्री चर्चेचा विषय ठरली.

अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरला व्हॅनमधून बाहेर काढले. हातात बेड्या, चेहऱ्यावर काळा स्कार्फ अशा अवस्थेत त्याने निवडणूक मैदानात प्रवेश केला. या क्षणाने उपस्थितांचे लक्ष अक्षरशः खिळवून ठेवले.

“मी उमेदवार आहे,” अशी घोषणा देत बंडू आंदेकरने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. नेकी का काम आंदेकर का काम, ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत’, ‘मी दरोडेखोर नाही, उमेदवार आहे’, ‘लोकशाहीत मला कसं आणलंय ते बघा’ अशा घोषणा देत त्याने आपली उमेदवारी जाहीर केली. यावेळी ‘वनराज आंदेकर जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना नगरसेवक होता. त्यानंतर आता लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी यापूर्वी लक्ष्मी आणि बंडू आंदेकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. मात्र, या व्हिडिओनंतर आता बंडू आंदेकरलाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हे देखील वाचा – Manvendra Singh UPSC Success Story : सेरेब्रल पाल्सीवर मात करत मनवेंद्रच्या यशाचा ऐतिहासिक प्रवास; पहिल्याच प्रयत्नात UPSC जिंकून मनवेंद्रने रचला यशाचा इतिहास

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या