Home / राजकीय / North Indians Banners : शिवसेना भवनासमोर पुन्हा उत्तर भारतीयांचे बॅनर

North Indians Banners : शिवसेना भवनासमोर पुन्हा उत्तर भारतीयांचे बॅनर

North Indians Banners – आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation elections)पार्श्वभूमीवर मुंबई परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दादर येथील शिवसेना...

By: Team Navakal
North Indians Banners
Social + WhatsApp CTA

North Indians Banners – आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation elections)पार्श्वभूमीवर मुंबई परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दादर येथील शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan)उत्तर भारतीयांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर लावण्यात आले आहेत. उत्तर भारतीय (Uttar Bharatiyon) सटोगे तो बचोगे, वरना बटोगे तो पिटोगे असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

महाराष्ट्र ते बिहारपर्यंत (Bihar) आणि राजस्थान (Rajasthan)ते उत्तर प्रदेशपर्यंत फक्त उत्तर भारतीय सेना असा इशाराही या बॅनरद्वारे देण्यात आला आहे. या मजकुरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मराठी (Marathi) मनसे जाग हो असे बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले होते. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून दोन दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर बटोगे तो पिटोगे असे बॅनर उत्तर भारतीयांकडून लावण्यात आले होते. त्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी नहीं बटोगे तो भी पिटोगे असे बॅनर लावले होते .

या बॅनरद्वारे उत्तर भारतीय समाजाला (North Indian communit) एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे चित्र आहे. उत्तर भारतीय सेनेच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे महापालिका निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.


हे देखील वाचा – 

 पुण्यात राजकारणाचा ब्लॉकबस्टर ड्रामा; आघाडी तुटली, दादांचा प्रस्ताव फेटाळला?

विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

राऊत परिवाराची राजकीय ताकद पुन्हा मैदानावर; संदीप राऊतांच्या महापालिका प्रवेशामुळे घराणेशाही चर्चेत

Web Title:
संबंधित बातम्या