Top Bike Launches 2025 India : भारतीय दुचाकी बाजारपेठेसाठी 2025 हे वर्ष अत्यंत रोमांचक ठरले आहे. या वर्षात अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या दमदार आणि हाय-टेक बाइक्स लाँच केल्या, ज्यांनी परफॉर्मन्स आणि स्टाईलच्या बाबतीय नवीन मानक प्रस्थापित केले. तुम्ही जर नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर या वर्षातील टॉप 5 लाँचवर एक नजर टाका:
2025 मधील 5 सर्वोत्तम बाइक लाँच
Aprilia Tuono 457: अप्रिलियाची ही नेकेड स्ट्रीटफाइटर बाईक फेब्रुवारीमध्ये बाजारात आली. यामध्ये 457cc चे ट्विन इंजिन असून ते 47 hp पॉवर जनरेट करते. प्रीमियम परफॉर्मन्स, क्विकशिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या आधुनिक फीचर्समुळे ही बाईक वेगाची आवड असणाऱ्या रायडर्ससाठी एक उत्तम पर्याय ठरली आहे.
TVS Apache RTX 300: टीव्हीएस कंपनीने ऑक्टोबरमध्ये आपली पहिली ॲडव्हेंचर बाईक सुमारे 1.99 लाख रुपयांत लाँच केली. यामध्ये 299cc चे नवीन इंजिन असून ते 35 hp पॉवर देते. स्विचेबल एबीएस, क्रूझ कंट्रोल आणि टीएफटी डिस्प्ले यांसारख्या फीचर्समुळे ही बाईक ऑफ-रोडिंग प्रेमींना आकर्षित करत आहे.
Royal Enfield Classic 650: रॉयल एनफिल्ड प्रेमींची दीर्घकाळापासून असलेली प्रतीक्षा मार्च महिन्यात संपली. यामध्ये 648cc चे पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून, यात जुनी रेट्रो स्टाईल आणि आधुनिक ताकद यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. या बाईकचा खास आवाज तिला क्लासिक प्रेमींमध्ये लोकप्रिय बनवतो.
Honda CB125 Hornet: होंडाची ही 125cc स्पोर्ट्स बाईक एन्ट्री-लेवल सेगमेंटमधील या वर्षातील सर्वात वेगवान बाईक ठरली आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी यात यूएसडी फोर्क्स, टीएफटी डिस्प्ले आणि एलईडी लायटिंग देण्यात आली आहे. दैनंदिन प्रवासासाठी एक स्टायलिश आणि पॉवरफुल बाईक शोधणाऱ्यांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
KTM 390 Adventure: नवीन जनरेशनची ही बाईक फेब्रुवारीमध्ये लाँच झाली आणि ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये तिने मोठी क्रांती केली. यात 399cc चे इंजिन असून ते 45 hp पॉवर जनरेट करते. ॲडजस्टेबल सस्पेंशन आणि ऑफ-रोड मोड्समुळे ही बाईक कठीण रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या तरुणांची पहिली पसंती बनली आहे.
हे देखील वाचा – विसरून जाल स्प्लेंडर आणि प्लॅटिना! Honda Shine 100 मध्ये मिळतात पॉवरफुल फीचर्स; जाणून घ्या का आहे ही गाडी खास?









