Home / महाराष्ट्र / Kolhapur News : कृष्णराज महाडिक यांच्या नगरसेवक पदाचे स्वप्न भंगले; महाडिकच्या माघारीने राजकारणात नवीन ट्विस्ट

Kolhapur News : कृष्णराज महाडिक यांच्या नगरसेवक पदाचे स्वप्न भंगले; महाडिकच्या माघारीने राजकारणात नवीन ट्विस्ट

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक अजब घटना समोर आली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक...

By: Team Navakal
Kolhapur News
Social + WhatsApp CTA

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक अजब घटना समोर आली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांचे नगरसेवक पदाच्या रेसमध्ये अचानक ब्रेक बसल्याचे दिसून येत आहे.

नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यापूर्वीच कृष्णराज महाडिक यांनी माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या २४ तासांपूर्वी भाजप महायुतीच्या अंतर्गत घडामोडींचा परिणाम म्हणून त्यांना या निर्णय घ्यावा लागल्याचे समोर आले आहे. याबाबत आज कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले की, “मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षपातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार मी महापालिका निवडणूक लढवणार नाही.

पुढे ते म्हणतात “भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, पक्षातील सर्व कार्यकर्ते काम करतात. पक्षीय पातळीवर घेतलेल्या निर्णयांचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करतो.

महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढवत आहे, अशा परिस्थितीत इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांपैकी योग्य उमेदवाराला संधी मिळावी, या विचारातून मी स्वतः निवडणूक लढवणे टाळत आहे.

पूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. मात्र आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार, मी निवडणूक लढणार नाही. तथापि, या निवडणुकीसाठी माझ्या नावाचा विचार झालाच, ही माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे.

यापुढेही समाजकारणात मी सतत कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि कुटुंबीयांचा मी ऋणी आहे.” कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नसले तरी, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग क्र. ३ मधून शनिवारी उमेदवारी अर्ज सादर केला.

शहर विकासात समन्वय आणि शाश्वत धोरणावर भर

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींमध्ये योग्य समन्वय आवश्यक आहे. नगर नियोजनाच्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

शहरात अनेक विकासकामे सुरू असली तरी, देखभालीच्या अभावामुळे वारंवार समान कामासाठी निधी खर्च केला जातो. याऐवजी, शहराच्या दीर्घकालीन विकासावर भर देण्यात येणार आहे. विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासकामांना प्राधान्य दिले जाईल आणि विरोधकांकडून येणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष केले जाईल.

कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत निवडणूक लढवण्याचा विश्वास
खासदार धनंजय महाडिक यांच्यावर राज्यभरातील जबाबदारी असल्यामुळे, त्यांना निवडणुकीसाठी फारसा वेळ देता येणार नाही. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या सोबतीने निवडणूक ताकदीने लढवली जाईल, असे त्यांचा विश्वास आहे.

हे देखील वाचा –  विसरून जाल स्प्लेंडर आणि प्लॅटिना! Honda Shine 100 मध्ये मिळतात पॉवरफुल फीचर्स; जाणून घ्या का आहे ही गाडी खास?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या