Home / राजकीय / Ravindra Dhangekar Son : रवींद्र धंगेकरांची भाजपाकडून कोंडी ! मुलगा अपक्ष लढणार

Ravindra Dhangekar Son : रवींद्र धंगेकरांची भाजपाकडून कोंडी ! मुलगा अपक्ष लढणार

Ravindra Dhangekar Son – पुणे महापालिका निवडणुकीत(Pune Municipal Corporation)भाजपाकडून पुण्यात शिंदे गटाची कोंडी केली जात आहे. शिंदे गटाचे (Shinde faction)...

By: Team Navakal
Ravindra Dhangekar Son
Social + WhatsApp CTA

Ravindra Dhangekar Son – पुणे महापालिका निवडणुकीत(Pune Municipal Corporation)भाजपाकडून पुण्यात शिंदे गटाची कोंडी केली जात आहे. शिंदे गटाचे (Shinde faction) प्रमुख नेते रवींद्र धंगेकर आता वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. धंगेकर यांनी आपला मुलगा प्रणव धंगेकर (Pranav Dhangekar) याला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

पुण्यात भाजपाकडून (BJP) शिंदे गटाची जाणीवपूर्वक कोंडी केली जात आहे, निवडून येण्याची शक्यता नसलेल्या जागाच शिंदे गटाला दिल्या जात आहेत असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २४ भाजपाकडून शिंदे गटासाठी सोडण्यात येत नसल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे.

https://www.instagram.com/p/DSo5S6WiA58/?utm_source=ig_web_button_share_sheet

प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर उमेदवारीसाठी इच्छुक असून, ही जागा युतीतून मिळाली नाही, तर प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवू शकतात, असे संकेत धंगेकरांनी दिले आहेत. रवींद्र धंगेकर हे पुण्यातील शिंदे गटाचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यास तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde)यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो.

याबाबत बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, आम्ही प्रणवला राजकारणात आणायचा निर्णय घेतला आहे. वॉर्डचे नाव बदलण्यात आले तेव्हा त्याने आंदोलन करून ‘कसबा गणपती’ (‘Kasba Ganpati’)हे नाव परत मिळवले. मी त्याच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. शिंदे जे सांगतील ते मी करेन आणि युतीधर्म पाळेन. मात्र शेवटी मुलगा स्वतःचा निर्णय घेईल. तो अपक्ष लढणार की शिंदे गटातून, हा निर्णय त्याचाच असेल. भाजपाने ज्या जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्या जागांवर आजपर्यंत भाजपा किंवा शिवसेना कोणीही निवडून आलेले नाही. अशा जागा घेऊन आम्ही काय करायचे? आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आमचे उमेदवार आम्हीच ठरवणार. उमेदवार आणि जागा दोन्ही दुसरेच ठरवत असतील तर कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविकच दुखावतील. लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाहीत. पुणे शहरात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल, तर निवडणुका कोणासाठी लढायच्या ?


हे देखील वाचा –

 India Extradition Fugitives : विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नीता अंबानी यांच्या हस्ते पार पडले रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जीवन’ कर्करोग व डायलिसिस केंद्राचे उद्घाटन

खासदार श्रीरंग बारणेंच्या मुलाचा लक्झरी कारमधून अर्ज दाखल

Web Title:
संबंधित बातम्या