BJP – महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाने (BJP )पुन्हा राक्षसी पातळीवर पक्ष फोडाफोडी सुरू केली आहे. शिंदे गट, उबाठा यांच्या बड्या नेत्यांना भाजपाने प्रवेश तर दिलाच, पण निष्ठावंतांना डावलून त्यांना पालिका निवडणुकीसाठी तिकिटही दिले. पालिका निवडणुका अनेक वर्षांनी होत आहेत. इतकी वर्षे भाजपाचे कार्यकर्ते किल्ला लढवत राहिले आणि आता तिकीट देण्याची वेळ आल्यावर मात्र इतर पक्षातून केवळ सत्तेसाठी भाजपात आलेल्यांना तिकीट दिले जात आहे याचा संताप आहे. इतकेच नव्हे तर समाजात भ्रष्ट, गुंड, माफिया, गुन्हेगार मानल्या गेलेल्या व्यक्तींना भाजपा सर्रास पक्षप्रवेश देत आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भडकले आहेत. संघाच्या उच्चपदस्थ नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते याची स्वयंसेवक वाट पाहत आहेत.
भाजपाने सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी केली आहे. आता संघही याच मार्गावर जातो की, भाजपाला धडा शिकवण्यासाठी निवडणुकीत विरोध करतो याकडे लक्ष आहे. सत्तेची चटक लागल्यावर भाजपाचा चेहरा काँग्रेसी झाली, भाजपा भ्रष्टाचार, व्यभिचार, गुन्हेगारी हे सर्व पचवू लागला. भाजपा सत्तेवर आल्यानंतर भाजपाने अनेक बँका, विद्यापीठे, महामंडळे यावर संघाशी निगडीत व्यक्तींचीच वर्णी लावण्यात आली. त्यामुळे संघालाही सत्तेच्या फायद्यांची माहिती झाली आहे. त्यामुळे आता भाजपाच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करीत संघ सत्तेच्या उबेत न्हात राहील की, आपण जी सुसंस्कृत देशाची भाषणे करतो, जे उपदेश देतो त्याला जागून संघ आता भाजपाला दिलेला पाठिंबा काढून घेऊन भाजपाचा पराभव करील का? असा सवाल भाजपाचे निष्ठावंत विचारत आहेत.
भाजपाने नाशिकमध्ये बदनाम असलेले सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेश दिला तेव्हा पक्षातून विरोध झाला. पण भाजपाने ऐकले नाही. या प्रवेशासाठी काही कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर विनायक पाटील, शाहू खैरे, यतिन वाघ, दिनकर पाटील यांना पक्षात घेऊन तिकीटही दिले. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी जाताना भाजपा मंत्री गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी अडवले. तिथे रेटारेटीही झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वीही भाजपाने अनेकांना पक्षप्रवेश दिला. त्यातील बहुसंख्य लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. 15 जानेवारीला पालिका निवडणूक मतदान आहे. त्याआधी संघ काही ठोस निर्णय घेणार का, असा प्रश्न आहे.
————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
दिल्ली-हावडा मार्गावर १२ डबे घसरले, रेल्वे ठप्प
अयोध्येत पालक म्हणून देवांची नावे मतदारयादीतून साधूंची नावे वगळणार?









