Home / महाराष्ट्र / Navneet Rana on Pawar Family : अजित पवार भाजपसोबत जाणं हा शरद पवारांचाच प्लॅन; नवनीत राणांचा मोठा दावा

Navneet Rana on Pawar Family : अजित पवार भाजपसोबत जाणं हा शरद पवारांचाच प्लॅन; नवनीत राणांचा मोठा दावा

Navneet Rana on Pawar Family : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या...

By: Team Navakal
Ajit Pawar On NCP
Social + WhatsApp CTA

Navneet Rana on Pawar Family : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत बारामतीमध्ये आज एक विशेष चित्र पाहायला मिळाले, ज्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

उद्योगपती गौतम अदाणी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस’चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर एकत्र दिसले. या भेटीनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी एक खळबळजनक विधान करत नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

अजित पवारांचे बंड हा शरद पवारांचाच प्लॅन?

पवार कुटुंबियांच्या या एकत्र येण्यावर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या की, अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन करणे, ही प्रत्यक्षात शरद पवार यांचीच इच्छा होती.

“जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी करून दोन दिवसांचे सरकार बनवले होते, तेव्हाही मी सांगितले होते की हे सर्व शरद पवार यांच्या आदेशानेच घडले आहे. आजही अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहेत, निवडणूक लढवत आहेत, हे सर्व चित्र शरद पवार यांनीच तयार केलेले आहे,” असा दावा राणा यांनी केला.

बारामतीतील भेटीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया

बारामतीत पवार कुटुंब एकत्र जेवण करताना आणि कार्यक्रमात एकत्र दिसले, यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही, असेही नवनीत राणा यांनी नमूद केले. ज्या नेत्यांनी एकमेकांवर वयावरून टीका केली किंवा जे एकमेकांचे तोंड पाहत नव्हते, ते आज एकाच मंचावर आहेत. यावरून अजित पवार सुरुवातीपासून जे सांगत होते तेच आज खरे ठरत आहे, असे राणा म्हणाल्या. अजित पवार भाजपसोबत जाणे हा शरद पवारांच्या मोठ्या राजकीय नियोजनाचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पडसाद

राज्यात 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. या निवडणुकांच्या तोंडावर पवार कुटुंबातील ही जवळीक आणि नवनीत राणांचे हे विधान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नवीन चर्चेला जन्म देणारे ठरले आहे. “अजित पवारांचे बंड हा शरद पवारांचाच प्लॅन होता का?” या प्रश्नावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या