BMC Election 2026 : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आज 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
यामध्ये अनुभवी चेहऱ्यांसोबतच नव्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महायुतीमधील जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीने ही यादी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
नवाब मलिक यांच्या कुटुंबातील 3 उमेदवार रिंगणात
या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची बहीण डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 168 हा महिला आरक्षित झाल्यामुळे कप्तान मलिक यांनी स्वतःसाठी नवीन प्रभाग निवडला असून जुन्या प्रभागात आपल्या सुनेला संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 उमेदवारांची संपूर्ण यादी:
- मनिष दुबे (वॉर्ड क्र. 3)
- सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. 48)
- अहमद खान (वॉर्ड क्र. 62)
- बबन रामचंद्र मदने (वॉर्ड क्र. 76)
- सुभाष जनार्दन पाताडे (वॉर्ड क्र. 86)
- सचिन तांबे (वॉर्ड क्र. 93)
- आयेशा शाम्स खान (वॉर्ड क्र. 96)
- सज्जू मलिक (वॉर्ड क्र. 109)
- शोभा रत्नाकर जाधव (वॉर्ड क्र. 113)
- हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (वॉर्ड क्र. 125)
- अक्षय मोहन पवार (वॉर्ड क्र. 135)
- ज्योती देविदास सदावर्ते (वॉर्ड क्र. 140)
- रचना रविंद्र गवस (वॉर्ड क्र. 143)
- भाग्यश्री राजेश केदारे (वॉर्ड क्र. 146)
- सोमू चंदू पवार (वॉर्ड क्र. 148)
- अब्दुल रशीद (कप्तान) मलिक (वॉर्ड क्र. 165)
- चंदन धोंडीराम पाटेकर (वॉर्ड क्र. 169)
- दिशा अमित मोरे (वॉर्ड क्र. 171)
- सबिया अस्लम मर्चंट (वॉर्ड क्र. 224)
- विलास दगडू घुले (वॉर्ड क्र. 40)
- अजय विचारे (वॉर्ड क्र. 57)
- हदिया फैजल कुरेशी (वॉर्ड क्र. 64)
- ममता धर्मेद्र ठाकूर (वॉर्ड क्र. 77)
- युसूफ अबुबकर मेमन (वॉर्ड क्र. 92)
- अमित अंकुश पाटील (वॉर्ड क्र. 95)
- धनंजय पिसाळ (वॉर्ड क्र. 111)
- प्रतिक्षा राजू घुगे (वॉर्ड क्र. 126)
- नागरत्न बनकर (वॉर्ड क्र. 139)
- चांदणी श्रीवास्तव (वॉर्ड क्र. 142)
- दिलीप हरिश्चंद्र पाटील (वॉर्ड क्र. 144)
- अंकिता संदीप द्रवे (वॉर्ड क्र. 147)
- लक्ष्मण गायकवाड (वॉर्ड क्र. 152)
- डॉ. सईदा खान (वॉर्ड क्र. 168)
- बुशरा परवीन मलिक (वॉर्ड क्र. 170)
- वासंथी मुरगेश देवेंद्र (वॉर्ड क्र. 175)
- किरण रविंद्र शिंदे (वॉर्ड क्र. 222)
- फरीन खान (वॉर्ड क्र. 197)
पक्षाने या सर्व उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचे वाटप करण्याचे ठरवले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता आमदार सना मलिक यांनी यापूर्वीच वर्तवली होती.
हे देखील वाचा – Navneet Rana on Pawar Family : अजित पवार भाजपसोबत जाणं हा शरद पवारांचाच प्लॅन; नवनीत राणांचा मोठा दावा









