Holiday List 2026 : 2025 हे वर्ष संपत आले असून अनेकांनी आतापासूनच 2026 या नवीन वर्षाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. सुट्ट्यांचे आगाऊ नियोजन केल्यास सहली, लग्नाचे मुहूर्त आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी सोयीचे पडते.
2026 च्या कॅलेंडरमध्ये अनेक मोठे सण आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार-रविवारच्या जोडीला आले आहेत, ज्यामुळे नोकरी करणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लांबलचक सुट्ट्यांचा आनंद घेता येईल.
2026 मधील प्रमुख सण आणि सुट्ट्यांची महिन्यानुसार यादी खालीलप्रमाणे आहे:
जानेवारी 2026
- 1 जानेवारी (गुरुवार): नवीन वर्ष
- 13 जानेवारी (मंगळवार): लोहरी
- 14 जानेवारी (बुधवार): मकर संक्रांत, पोंगल
- 23 जानेवारी (शुक्रवार): वसंत पंचमी, सुभाषचंद्र बोस जयंती
- 26 जानेवारी (सोमवार): प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी 2026
- 15 फेब्रुवारी (रविवार): महाशिवरात्री
- 19 फेब्रुवारी (गुरुवार): छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)
मार्च 2026
- 4 मार्च (बुधवार): होळी (धुलिवंदन)
- 6 मार्च (शुक्रवार): छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)
- 19 मार्च (गुरुवार): गुढीपाडवा
- 20 मार्च (शुक्रवार): रमजान ईद (ईद-उल-फितर), पारशी नवीन वर्ष
- 26 मार्च (गुरुवार): रामनवमी
एप्रिल 2026
- 3 एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे
- 14 एप्रिल (मंगळवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी
मे 2026
- 1 मे (शुक्रवार): महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा
- 27 मे (बुधवार): बकरी ईद (ईद-उल-अधा)
जून आणि जुलै 2026
- 17 जून (बुधवार): इस्लामिक नवीन वर्ष
- 26 जून (शुक्रवार): मोहरम
- 29 जुलै (बुधवार): गुरुपौर्णिमा
ऑगस्ट 2026
- 15 ऑगस्ट (शनिवार): स्वातंत्र्यदिन
- 26 ऑगस्ट (बुधवार): ओणम, ईद-ए-मिलाद
- 28 ऑगस्ट (शुक्रवार): रक्षाबंधन
सप्टेंबर 2026
- 4 सप्टेंबर (शुक्रवार): श्रीकृष्ण जन्माष्टमी
- 14 सप्टेंबर (सोमवार): गणेश चतुर्थी
ऑक्टोबर 2026
- 2 ऑक्टोबर (शुक्रवार): गांधी जयंती
- 19 ऑक्टोबर (सोमवार): महानवमी
- 20 ऑक्टोबर (मंगळवार): दसरा
नोव्हेंबर 2026
- 8 नोव्हेंबर (रविवार): नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन (दिवाळी)
- 10 नोव्हेंबर (मंगळवार): गोवर्धन पूजा
- 11 नोव्हेंबर (बुधवार): भाऊबीज
- 24 नोव्हेंबर (मंगळवार): गुरुनानक जयंती
डिसेंबर 2026
- 25 डिसेंबर (शुक्रवार): नाताळ (ख्रिसमस)
नवीन वर्षात गुढीपाडवा आणि रमजान ईद एकापाठोपाठ आल्याने मार्च महिन्यात मोठी सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच दिवाळी नोव्हेंबरमध्ये असल्याने वर्षाचा शेवट सण-उत्सवांनी भरलेला असेल.
हे देखील वाचा – लूक पाहून व्हाल वेडे! Kawasaki ने लाँच केली नवीन Ninja 1100SX; जाणून घ्या इंजिन आणि हाय-टेक फीचर्स









