New Car Launches : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी 2026 चे पहिले महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जानेवारी महिन्यात एकापेक्षा एक सरस अशा 5 नवीन गाड्या लाँच होणार आहेत. यामध्ये पेट्रोल इंजिन असलेल्या एसयुव्हीपासून ते प्रगत इलेक्ट्रीक मॉडेलपर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मारुती, महिंद्रा आणि रेनॉल्ट सारख्या दिग्गज कंपन्या नवीन वर्षात मोठा धमाका करण्यास सज्ज आहेत.
जानेवारी 2026 मध्ये लाँच होणाऱ्या गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
1. Maruti Suzuki e-Vitara
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक मिड-साईज एसयुव्ही जानेवारीमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. ही गाडी Heartect-e प्लॅटफॉर्मवर आधारित असून ती 49kWh आणि 61kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. मोठी बॅटरी एका चार्जवर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देईल असा दावा केला जात आहे. यामध्ये लेव्हल-2 एडास आणि आधुनिक ड्युअल फ्लोटिंग स्क्रीनसारखे फीचर्स मिळतील.
2. New Renault Duster
बहुप्रतिक्षित नवीन पिढीतील ‘रेनॉल्ट डस्टर’ 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लाँच होणार आहे. या गाडीचा लूक पूर्णपणे बदलला असून तो बिगस्टर कन्सेप्टपासून प्रेरित आहे. वाय-आकाराचे एलईडी लाइट्स, मजबूत बॉडी क्लॅडिंग आणि जास्त ग्राउंड क्लीयरन्स ही या गाडीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही गाडी पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि प्रीमियम असेल.
3. Skoda Kushaq Facelift
स्कोडा आपली लोकप्रिय कुशाक गाडी नवीन रुपात जानेवारीच्या मध्यापर्यंत लाँच करेल. यामध्ये नवीन डिझाइनचे बंपर, रिफ्रेश्ड ग्रिल आणि स्लीक एलईडी टेल-लॅम्प्स मिळतील. सुरक्षिततेसाठी यामध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि एडास फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गाडीच्या अंतर्गत भागातही अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
4. Mahindra XUV 7XO
महिंद्रा आपल्या सध्याच्या एक्सयुव्ही 700 चे फेसलिफ्ट व्हर्जन ‘महिंद्रा XUV 7XO’ या नावाने 5 जानेवारीला लाँच करणार आहे. यामध्ये ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड लेआउट मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन ग्रिल आणि सुधारित लाइटिंगमुळे ही गाडी अधिक आधुनिक दिसेल. तसेच इंजिनमध्ये किरकोळ बदल करून कामगिरी सुधारली जाण्याची अपेक्षा आहे.
5. Second Generation Kia Seltos
किआ मोटर्स 2 जानेवारी 2026 रोजी आपली लोकप्रिय एसयुव्ही सेल्टोसचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच करेल. ही कार नवीन के3 प्लॅटफॉर्मवर आधारित असून तिचा लूक आधीपेक्षा जास्त बोल्ड आणि अपराइट असेल. यामध्ये 12.3 इंचाच्या दोन मोठ्या डिजिटल स्क्रीन असतील, ज्या इन्फोटेनमेंट आणि ड्रायव्हर माहितीसाठी वापरल्या जातील.
हे देखील वाचा – लूक पाहून व्हाल वेडे! Kawasaki ने लाँच केली नवीन Ninja 1100SX; जाणून घ्या इंजिन आणि हाय-टेक फीचर्स









