Home / महाराष्ट्र / Raj thackeray : वाद बाजूला ठेवून लढा ! राज ठाकरेंचा मेळाव्यात संदेश

Raj thackeray : वाद बाजूला ठेवून लढा ! राज ठाकरेंचा मेळाव्यात संदेश

Raj thackeray – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेने मविआतील उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. मनसे पहिल्यांदाच युती करून...

By: Team Navakal
raj thackeray
Social + WhatsApp CTA

Raj thackeray – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेने मविआतील उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. मनसे पहिल्यांदाच युती करून निवडणुकीला सामोरी जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj thackeray) आज  कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा पहिला मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे. हा लढा जागांचा नाही, तर अस्तित्वाचा आहे. वाद बाजूला ठेवून एकजुटीने निवडणूक लढा.


राज ठाकरे म्हणाले की, इतकी वर्षे आपण सत्तेविना राहिलो. पण आपल्या पक्षाचा दबदबा कमी झालेला नाही. आज भाजपाकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे. त्या जीवावर ते माज करत आहेत. अनेकांना वाटते की, भाजपात गेले तर फायदा होईल. पण त्या पक्षात गेलेल्या लोकांवर टांगती तलवार आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत मी अनेक गोष्टी काढणार आहे. कोणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितापुढे स्वार्थ क्षुल्लक आहेत. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली आहे.


राज ठाकरे यांनी असेही सांगितले की, देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्त्वाची आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे काही लोकांचे स्वप्न असून, त्यासाठी नियोजनपूर्वक हालचाली सुरू आहेत. निवडणुका येतात आणि जातात. मात्र मुंबई आपल्या हातातून जाणे परवडणारे नाही. आपल्याला मुंबई वेगळी करण्याचे स्वप्न पाहणार्‍यांचे मनसुबे उद्ध्वस्त करायचे आहेत. वाद बाजूला ठेवून निवडणूक एकजुटीने लढवणे महत्त्वाचे आहे. ईव्हीएमबाबत शंका आहेतच. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रचार केला. तिथपर्यंत ठीक होते. परंतु पालिका निवडणुकीसाठीही पंतप्रधान मोदी प्रचार करणार हे योग्य वाटत नाही. गेल्या 20 वर्षांत मनसेने नेहमी स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. युती किंवा आघाडीमध्ये जाण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे काही जागांवर नाराजी असू शकते. युतीत उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे उमेदवार असतील. मनसे कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचारापर्यंत पूर्ण ताकदीने सक्रिय सहभाग घ्यावा. आज मनसेकडून एबी फॉर्म दिले जात आहेत.

जागांबाबत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू असते. त्यामुळे संयम राखावा. ही एकच निवडणूक नाही. पुढेही ठाकरे बंधू वारंवार निवडणुका लढवणार आहेत. प्रत्येकाला संधी दिली जाईल. आज सर्व मतभेद बाजूला ठेवून मुंबई वाचवण्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

गुळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर; पचन सुधारते आणि उर्जा वाढवते

 सत्तेचा सिंहासनासाठी लढा; मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ४२ जणांची यादी समोर..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या