Waterproof Phones Under 15000 : पावसाळ्याचे दिवस असोत किंवा चुकून फोनवर पाणी सांडण्याची भीती, स्मार्टफोन सुरक्षित राहण्यासाठी त्याला वॉटर रसिस्टन्स असणे खूप गरजेचे असते. पूर्वी केवळ महागड्या फोन्समध्ये मिळणारे हे फिचर आता बजेट स्मार्टफोन्समध्येही पाहायला मिळत आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले असे काही खास फोन्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत.
Infinix Hot 60 5G+
बजेट सेगमेंटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या इन्फिनिक्सच्या या फोनला IP64 रेटिंग देण्यात आले आहे. रोजच्या वापरातील धूळ आणि पाण्याचे शिंतोडे यामुळे फोन खराब होण्याचे टेन्शन यामध्ये राहत नाही. अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध असलेला हा फोन साधारण 10,499 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Redmi Note 14 SE 5G
अमोलेड डिस्प्ले आणि प्रीमियम डिझाइन असलेल्या या फोनला IP64 रेटिंगची सुरक्षा लाभली आहे. यामुळे फोन केवळ दिसायलाच सुंदर नाही तर तो पाणी आणि धुळीपासूनही सुरक्षित राहतो. शाओमीचा हा नोट सिरीजमधील लोकप्रिय फोन तुम्ही 13,499 रुपयांना खरेदी करू शकता.
Vivo Y31 5G
या यादीतील सर्वात मजबूत फोन म्हणून विवोच्या या मॉडेलकडे पाहिले जाते. याला चक्क IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे, जे या किमतीतील फोनसाठी खूप दुर्मिळ मानले जाते. हा फोन जोरदार पाऊस आणि पाण्यात बुडाल्यावरही उत्तम सुरक्षा देतो. या फोनची किंमत 14,499 रुपयांपासून सुरू होते.
Poco M7 Plus 5G
बाहेर फिरणाऱ्या लोकांसाठी आणि जिममध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी पोकोचा हा फोन एक उत्तम पर्याय आहे. याला मिळालेले IP64 रेटिंग पाण्याचे थेंब आणि घामापासून फोनचा बचाव करते. हा विश्वासार्ह फोन बाजारपेठेत 11,849 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
Redmi 15 5G
दैनंदिन वापरासाठी एक मजबूत फोन शोधणाऱ्यांसाठी रेडमी 15 5G हा एक उत्तम पर्याय आहे. याला IP64 रेटिंग मिळाले असून हलका पाऊस आणि धुळीपासून हा फोन सुरक्षित राहतो. हा फोन सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर 14,183 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – Aravalli Hills: अरवली पर्वत रांगेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! स्वतःच्याच आदेशाला दिली स्थगिती; खाणकामावर बंदी कायम









