Diabetes Kidney Failure Symptoms : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये किडनी निकामी होण्याची समस्या अत्यंत शांतपणे सुरू होते आणि नंतर ती गंभीर रूप धारण करते. अनेकदा किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे रुग्णांना लवकर लक्षात येत नाहीत. मात्र, योग्य वेळी ही लक्षणे ओळखून चाचण्या केल्यास आजाराचा वेग कमी करता येऊ शकतो
किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे
शरीरात पाणी साचणे हे किडनी डॅमेज होण्याचे पहिले लक्षण असू शकते. जेव्हा किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास असमर्थ ठरते, तेव्हा ते साचू लागते.
- सूज येणे: पायांना किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला हलकी सूज येणे हा पहिला इशारा असू शकतो.
- लघवीतील बदल: लघवीला फेस येणे किंवा बुडबुडे दिसणे याचा अर्थ लघवीतून प्रथिने बाहेर पडत आहेत.
- वारंवारता: रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागणे किंवा लघवीचे प्रमाण अचानक कमी होणे.
- रंग बदलणे: लघवीचा रंग गडद किंवा चहाच्या रंगासारखा होणे.
- थकवा आणि दाब: सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा किंवा पाठीच्या खालच्या भागात जडपणा जाणवणे.
- रक्तदाब: रक्तदाब थोडासा वाढला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे किडनीवर ताण असल्याचे लक्षण असू शकते.
किडनी खराब होत आहे हे कसे ओळखावे?
केवळ लक्षणांवर अवलंबून न राहता नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. मधुमेह किडनीपर्यंत पोहोचला आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर 2 महत्त्वाच्या चाचण्या सुचवतात:
- UACR (युरीन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेश्यो): ही लघवीची चाचणी आहे.
- eGFR (ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट): ही रक्ताची चाचणी आहे.
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक मधुमेही रुग्णाने वर्षातून किमान 1 वेळा UACR आणि eGFR या दोन्ही चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. यामुळे आजाराचे सुरुवातीच्या काळातच निदान होऊन उपचार सुरू करणे सोपे जाते.
हे देखील वाचा – Aravalli Hills: अरवली पर्वत रांगेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! स्वतःच्याच आदेशाला दिली स्थगिती; खाणकामावर बंदी कायम









