Home / महाराष्ट्र / JJ Hospital Shootout : जेजे हत्याकांडाचे लागेबांधे पुन्हा उलगडणार?३३ वर्षांचा जेजे हत्याकांडाचा थरार…

JJ Hospital Shootout : जेजे हत्याकांडाचे लागेबांधे पुन्हा उलगडणार?३३ वर्षांचा जेजे हत्याकांडाचा थरार…

JJ Hospital Shootout : महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक घटना घडल्या, अनेक वेळा राज्याच्या राजकारणात आणि समाजात उलथापालथ झाली. परंतु काही घटना...

By: Team Navakal
JJ Hospital Shootout
Social + WhatsApp CTA

JJ Hospital Shootout : महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक घटना घडल्या, अनेक वेळा राज्याच्या राजकारणात आणि समाजात उलथापालथ झाली. परंतु काही घटना इतक्या खोलवर मनावर कोरल्या की त्या वर्षानुवर्षे विसरल्या जाऊ शकत नाहीत. अशाच घटनांपैकी एक म्हणजे जे-जे हत्याकांड. हि गोष्ट जवळ-जवळ १९९२ सालची इतकी जुनी गोष्ट पण या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. पण इतक्या वर्षांनी हि घटना परत का? मागे सोडून आलेल्या गोष्टींचं आता काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या बहुचर्चित गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त पुरावे नोंदवण्यात आले आहेत.

विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याची कार्यवाही पुन्हा गती धरली आहे. यामुळे या प्रकरणातील न्यायलयीन प्रक्रियेत पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा झाला असून, आरोपींविरुद्ध पुरावे अधिक तपासल्या जाणार आहेत. विशेष टाडा न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रम देण्यात आला आहे.

जवळ जवळ ३२ वर्ष मागे मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर रुग्णांच्या तपासणीत गर्क होते, नर्सेस रुग्णसेवेत व्यस्त होत्या अगदी रोजसारखेच ते चित्र होते पण ती सकाळ भयावह होती. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये अचानक बेछूट गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर या मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. आता अरुण गवळी बद्दल वेगळं सांगायलाच नको महाराष्ट्रातील घर घरात अरुण गवळी कोण हे सगळ्यांना माहिती असेल.

त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधी शैलेश हळदणकर एका चकमकीत जखमी झाला होता आणि तातडीने पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. हळदणकरच्या अगदी बाजूच्याच खाटेवर गवळीचा आणखी एक साथीदार बिपीन शेरे हाही जखमी अवस्थेत दाखल होता. हळदणकरच्या जवळ दोन सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते.

त्या सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास, काही लोक ‘हळदणकरला भेटायचंय’ म्हणत वॉर्डात घुसले. क्षणभरात त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढल्या आणि हळदणकर तसेच त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात हळदणकर आणि दोन्ही पोलीस जागीच ठार झाले.त्यावेळी पोलिसांनी या घटनेची न्यायालयात माहिती दिली होती. ही घटना मुंबईतील गुन्हेगारी आणि हिंसात्मक इतिहासातील एक भयानक आणि थरारक घटना म्हणून आजही लक्षात ठेवली जाते.

पोलिसांच्या माहितीनुसार, ८०च्या दशकात गुन्हेगारी विश्वात मोठी उलथापालथ झाली होती. मागचा इतिहास असे सांगतो की कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी आधीच्या काळात एकत्रच काम करत होते. मात्र नंतर त्यांच्या टोळ्यांमध्ये मोठी फूट पडली. ८० च्या दशकातली हि मोठी फूट मानली जात होती. आणि त्यानंतर ही फूट वाढत दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. आणि या घर्षाची ठिणगी पडली ती, दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरच्या खुनामुळे. पारकरच्या हत्येमागे गवळी टोळीच असल्याची दाऊदला दाट शक्यताला होती. त्याचा बदला घेण्यासाठी हे जेजे हत्याकांड करवण्यात आलं, अशी माहिती तत्कालीन खटल्यामध्ये मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली होती. या खटल्यात या आधी काही जणांना शिक्षा देखील झाली होती. परंतु तरीही ह्या प्रकरणाने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे.

मागच्या वर्षी, २०२४ ऑक्टोबरमध्ये, या प्रकरणात त्रिभुवन रामपती सिंग उर्फ श्रीकांत राय / प्रधान याला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली. ही अटक ३२ वर्ष जुने प्रकरण पुन्हा एकदा सामोरे आणणारी घटना ठरली. या प्रकरणात तब्बल ३२ वर्षांनंतर ही अटक झाली. या प्रकरणातील मूळचे तपास अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. १९९० च्या सुमारास डिजिटल डेटाबेस हा प्रकारमुळी जन्माला आलाच न्हवता. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लावणे तितकेसे कठीण होते. मात्र मुंबई पोलिसांनी संयमाने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली. या ३२ वर्ष जुन्या केसाला पुन्हा उभ राहताना याच्या मुळाशी काय दडलं असेल हे पाहन महत्वाचं ठरणार आहे. शिवाय या प्रकारची चौकशी कोणतं नवीन वळण घेते ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे

हे देखील वाचा – Aravalli Hills: अरवली पर्वत रांगेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! स्वतःच्याच आदेशाला दिली स्थगिती; खाणकामावर बंदी कायम

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या