Home / News / India Sweep Sri Lanka : भारताचा श्रीलंकेवर ५-० दमदार विजय ! दीप्तीचा विक्रम 

India Sweep Sri Lanka : भारताचा श्रीलंकेवर ५-० दमदार विजय ! दीप्तीचा विक्रम 

India Sweep Sri Lanka – भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी-२० मालिकेच्या सामन्यात ५-० असा दमदार विजय...

By: Team Navakal
India Sweep Sri Lanka
Social + WhatsApp CTA

India Sweep Sri Lanka – भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी-२० मालिकेच्या सामन्यात ५-० असा दमदार विजय मिळवला. आज ग्रीनफील्ड स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. दीप्तीने १५१ विकेटचे ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटचे रेकोर्ड तोडून १५२ विकेट घेण्याचा विक्रम केला.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७५ धावा केल्या. शेफाली वर्मा, जी कमलिनी, रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी फलंदाजी करत श्रीलंकेला मजबूत आव्हान दिले.

१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने संयमी सुरुवात केली. कर्णधार चमारी अथापथु आणि हसिनी परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. मात्र दीप्ती शर्मासह भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला २० षटकांत १६० धावांपर्यंत रोखले.या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकत श्रीलंकेचा पूर्णपणे पराभव केला. 


हे देखील वाचा – 

Air Pollution Across India : संपूर्ण भारतात वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

रोहित-विराटवर कसोटी क्रिकेट सोडण्यास दबाव? माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा दावा …

रेल्वे वेळापत्रकात १ जानेवारीपासून मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या प्रवासाचा अचूक वेळ..

Web Title:
संबंधित बातम्या