Home / लेख / Upcoming Smartphones : थोडी वाट पाहा! जानेवारीत लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स; 200MP कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी

Upcoming Smartphones : थोडी वाट पाहा! जानेवारीत लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स; 200MP कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी

Upcoming Smartphones: स्मार्टफोन प्रेमींसाठी 2026 या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत जबरदस्त होणार आहे. जानेवारी महिन्यात सॅमसंग, रियलमी, ओप्पो आणि शाओमी...

By: Team Navakal
Upcoming Smartphones
Social + WhatsApp CTA

Upcoming Smartphones: स्मार्टफोन प्रेमींसाठी 2026 या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत जबरदस्त होणार आहे. जानेवारी महिन्यात सॅमसंग, रियलमी, ओप्पो आणि शाओमी सारखे दिग्गज ब्रँड्स आपले नवनवीन मॉडेल्स बाजारात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर जानेवारीत लाँच होणाऱ्या या फोन्सची यादी नक्की तपासा.

Realme 16 Pro Series

भारतात 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता ही बहुप्रतिक्षित सिरीज लाँच केली जाणार आहे. यामध्ये Realme 16 Pro आणि Realme 16 Pro+ या दोन मॉडेलचा समावेश असेल. या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 7,000mAh ची मोठी बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. हे फोन्स फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Honor Power 2

ज्यांना फोनची बॅटरी लवकर संपण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी ऑनर 5 जानेवारी 2026 रोजी आपला नवीन फोन लाँच करत आहे. Honor Power 2 मध्ये तब्बल 10,080mAh ची प्रचंड मोठी बॅटरी देण्यात आली आहे. एका चार्जवर तुम्ही 22 तास सलग शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता किंवा 14 तासांहून अधिक वेळ गेमिंग करू शकता. हा फोन सुरुवातीला चीनमध्ये दाखल होईल.

OnePlus Turbo 6

वनप्लसची ही नवीन परफॉर्मन्स सिरीज 8 जानेवारी 2026 रोजी चीनमध्ये लाँच होत आहे. OnePlus Turbo 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जनरेशन 4 चिपसेट आणि 9,000mAh ची शक्तिशाली बॅटरी असणार आहे. गेमिंग आणि वेगवान चार्जिंगसाठी या फोनमध्ये 80W वायर चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

Oppo Reno 15 Series

ओप्पो आपली Oppo Reno 15 Series भारतात लवकरच लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने अद्याप तारीख जाहीर केली नसली तरी, हा लाँच कार्यक्रम 8 जानेवारी 2026 रोजी होण्याची दाट शक्यता आहे. यात Oppo Reno 15, Oppo Reno 15 Pro आणि Oppo Reno 15 Pro Mini हे तीन मॉडेल असतील, ज्यामध्ये एरोस्पेस-ग्रेड अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला आहे.

Poco M8 Series

पोको आपला Poco M8 5G फोन भारतात 8 जानेवारी 2026 रोजी लाँच करणार आहे. हा या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा आणि 7.35 मिमी जाडीची आकर्षक बॉडी पाहायला मिळेल.

Samsung Galaxy S26 Series

सॅमसंगची फ्लॅगशिप सिरीज जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला समोर येण्याची अपेक्षा आहे. या सिरीजमध्ये Samsung Galaxy S26, Samsung Galaxy S26+ आणि Samsung Galaxy S26 Ultra यांचा समावेश असेल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 हा सर्वात आधुनिक प्रोसेसर वापरला जाण्याची शक्यता आहे.

या व्यतिरिक्त Xiaomi 17 सिरीज आणि Vivo V70 देखील 2026 च्या पहिल्या तिमाहीत भारतीय बाजारात आपली उपस्थिती लावू शकतात.

हे देखील वाचा – MNS Candidate List: राज ठाकरेंचा ‘ठाणे प्लॅन’ तयार! मनसेच्या 28 उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या