Home / महाराष्ट्र / Samajwadi Party : समाजवादीला जागा सोडल्या ! मुस्लीम विभागात महायुती गायब

Samajwadi Party : समाजवादीला जागा सोडल्या ! मुस्लीम विभागात महायुती गायब

Samajwadi Party – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी महायुतीची रणनीती संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. शहरातील दोन मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात...

By: Team Navakal
abu azmi
Social + WhatsApp CTA

Samajwadi Party – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी महायुतीची रणनीती संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. शहरातील दोन मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार बाद ठरल्यामुळे प्रभाग  क्रमांक 211 आणि 212 मध्ये मतदानापूर्वीच महायुती निवडणुकीबाहेर पडली असून, या जागा समाजवादी पक्षासाठी  (सपा) ( Samajwadi Party) जाणूनबुजून सोडल्या का, अशी चर्चा रंगू लागली आहे.


वॉर्ड क्रमांक 211 (नागपाडा) येथे शिंदेंच्या उमेदवाराचा अर्ज कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे बाद करण्यात आला. या प्रभागात सपाकडून ऐजाज अहमद खान हे उमेदवार असून, यापूर्वी रईस कासम शेख हे सपाकडून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.


वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपाच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात 15 मिनिटे उशिरा पोहोचल्याने आयोगाने अर्ज फेटाळला. या प्रभागात ठाकरे बंधुंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, सपाकडून अमरीन शेजाद अब्राहानी तर काँग्रेसकडून नाझिया अशफाक सिद्दीकी या उमेदवार आहेत. दोन्ही प्रभाग मुस्लीमबहुल असल्याने भाजपाने जाणूनबुजून सपासाठी या जागा मोकळ्या ठेवल्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे मुस्लीम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्ये करायची व त्याच प्रभागांत सपाला फायदा करून द्यायचा, असा आरोप केला जात आहे.

—————————————————————————————————————————————————-

हे देखील वाचा – 

मऊ बन, कुरकुरीत पॅटी आणि ताजेतवाने सॉस -पनीर बर्गरची जबरदस्त रेसिपी

 संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल; बॉम्ब से उडा दूंगा”- संजय राऊतच्या घरासमोर संशयित गाडीचा वावर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या