Home / महाराष्ट्र / Gen Z : इराणमध्ये खामेनेईंच्या विरोधात जेन झी रस्त्यावर! अंतिम लढाई

Gen Z : इराणमध्ये खामेनेईंच्या विरोधात जेन झी रस्त्यावर! अंतिम लढाई

Gen Z – नेपाळ, मादागास्कर आणि मोरोक्कोनंतर आता इराणमध्येही जेन झी (Gen Z) पिढी थेट सत्तेविरोधात रस्त्यावर उतरली. राजधानी तेहरानसह...

By: Team Navakal
Gen Z
Social + WhatsApp CTA

Gen Z – नेपाळ, मादागास्कर आणि मोरोक्कोनंतर आता इराणमध्येही जेन झी (Gen Z) पिढी थेट सत्तेविरोधात रस्त्यावर उतरली. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये हजारो तरुणांनी आंदोलन छेडत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही अंतिम लढाई आहे अशा घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यांपासून शॉपिंग मॉल आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांपर्यंत आंदोलन केले.


देशभरात व्यापार्‍यांचा संप आणि विरोध कायम असून, तेहरानचा ग्रँड बाजार, नासेर खोसरो, लालेहजार स्ट्रीट आणि इस्तंबुल स्क्वेअर येथील दुकाने बंद ठेवण्यात आली. आंदोलन रोखण्यासाठी इराणी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा आणि रबरी बुलेटचा वापर केला. मात्र दडपशाही असूनही आंदोलक माघार घेण्यास तयार नव्हते. अनेक ठिकाणी आंदोलकांनी सुरक्षा दलांबरोबर  झटापट केली.


इराणमध्ये अचानक उसळलेल्या या जनआंदोलनामागे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या धोरणांबाबत वाढलेला असंतोष हे प्रमुख कारण मानले जात आहे. इराण सध्या भीषण आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकला आहे. अमेरिकेचे निर्बंध, प्रादेशिक संघर्ष आणि सरकारच्या धोरणांमुळे इराणी चलन रियाल डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले आहे. परिणामी महागाईने उच्चांक गाठला असून, दैनंदिन गरजेच्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. या विरोधात  सुरुवातीला तेहरानमधील व्यापारी आणि दुकानदारांनी आर्थिक संकटाविरोधात आंदोलन सुरू केले होते. मात्र आता त्यात विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा –

श्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच अडकणार विवाहबंधनात? या तारखेला होणार लग्न

सत्तेचा सिंहासनासाठी लढा; मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ४२ जणांची यादी समोर..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या