Home / महाराष्ट्र / Sheetal Devrukhakar Sheth : ठाकरेंच्या शिवसेनेत बंड खोरीची लाट; २२ वर्षानंतर ठोकला पक्षाला रामराम

Sheetal Devrukhakar Sheth : ठाकरेंच्या शिवसेनेत बंड खोरीची लाट; २२ वर्षानंतर ठोकला पक्षाला रामराम

Sheetal Devrukhakar Sheth : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे अधिक थरारक झाले असल्याचे दिसून येत आहे. पक्षांतराच्या चपळ हालचाली...

By: Team Navakal
Sheetal Devrukhakar Sheth
Social + WhatsApp CTA

Sheetal Devrukhakar Sheth : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे अधिक थरारक झाले असल्याचे दिसून येत आहे. पक्षांतराच्या चपळ हालचाली देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट) पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांच्या अपेक्षेनुसार संधी मिळाली नाही. त्यांना ठाकरे गटाकडून डावलण्यात आल्यामुळे त्या नाराज झाल्या.

अखेर, नाराजी व्यक्त करत शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षाला सोडून भाजपामध्ये पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा हा निर्णय शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

नेमक्या कोण आहरेत शीतल देवरुखकर शेठ?
शीतल देवरुखकर शेठ या मुंबई सिनेटच्या सदस्य आहेत. त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेनेच्या कोअर टीममध्ये पदाधिकारी होत्या आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या.

मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक ५१ मधून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक होत्या, मात्र पक्षाकडून त्यांना अपेक्षित तिकीट न मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या.

शीतल देवरुखकर शेठ यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेनेच्या कोअर टीमच्या पदाधिकारी शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षातिल सर्व संघटनात्मक पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

राजीनामा पत्रात शीतल देवरुखकर शेठ यांनी नम्रपणे सांगितले आहे की, “२००३ पासून मी पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत असून, गेल्या २२ वर्षांमध्ये पक्षाने सोपवलेली सर्व कामे मोठ्या जबाबदारीने, प्रामाणिकपणे व एकनिष्ठतेने यशस्वीरीत्या पार पाडली आहेत. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे मी माझ्या सर्व संघटनात्मक पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षात कार्यरत असताना आपण दिलेल्या सर्व संधींबाबत मी सदैव आपली ऋणी राहीन.”अशा भावना शीतल देवरुखकर शेठ यांनी आपल्या राजीनामा पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

मुंबईतील राजकीय घडामोडींमध्ये नवीन वळण आलं आहे. शिवसेना गटातील माजी युवासेना पदाधिकारी शीतल देवरुखकर शेठ यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्र वाघ यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

शीतल देवरुखकर शेठ यांना शिवसेना गटाकडून महापालिका निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही. तरीही आता भाजपात प्रवेश करून त्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवा मार्ग देत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपची ताकद कशी वाढते, हे पुढील काळात स्पष्ट होईल.

एकापाठोपाठ जुने आणि निष्ठावान शिलेदार शिवसेना गटातून बाहेर पडत असल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी रोखणे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांभाळणे ही मोठी जबाबदारी आहे.

हे देखील वाचा – Pune Election 2026 : पुण्यातील राजकीय ड्रामा; एबी फॉर्म गिळून दिला प्रतिस्पर्ध्याला धक्का

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या