Home / महाराष्ट्र / Pooja Jadhav ; निवडणुकीतून माघार, पण संघर्ष थांबणार नाही; भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून माघार

Pooja Jadhav ; निवडणुकीतून माघार, पण संघर्ष थांबणार नाही; भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून माघार

Pooja Jadhav : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, पूजा जाधव ह्यांनी अर्ज मागे...

By: Team Navakal
Pooja Jadhav
Social + WhatsApp CTA

Pooja Jadhav : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, पूजा जाधव ह्यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर उमेदवारीच्या घोषणेनंतर जोरदार टीका करण्यात आली होती, त्याचा परिणाम म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

दरम्यान पुण्यात पत्रकार परिषद घेत पूजा जाधव हिने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, “विरोधकांनी षडयंत्र रचले आणि त्याची बळी मी ठरले.” तसेच, त्यांनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक बांधिलकीबाबत सांगितले की, “मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी काम करेन. आतापर्यंत झालेल्या चुका असल्यास त्याबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज आहे तिथे मी काम करणार आहे.”

पूजा जाधव ह्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, “वाघीण जखमी झाल्यावरही ती अजून जोरात काम करते, तसेच मीही कामात पूर्ण मनोबलाने सहभागी राहीन.”

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून माघार घेतलेल्या भाजपच्या उमेदवार पूजा जाधव ह्यांनी पत्रकार परिषदेत आपले अनुभव उघड केले आणि रडू लागल्या. त्यांनी सांगितले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड आहे. मला गेल्या दहा ते बारा वर्षांचा संघर्ष आठवतो.”

पूजा जाधव यांचा जन्म बीडच्या गेवराई तालुक्यातील गावात झाला. त्या म्हणतात माझे वडील ग्रामपंचायतीचे सरपंच देखील न्हवते, तरी देखील मी शेतकऱ्यांसाठी काम केले आणि वयाच्या २१ व्या वर्षी पंचायत समितीत काम सुरू केले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिल्यामुळे माझ्यावर पाच गुन्हे दाखल झाले. महिलांचा, शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या लाठ्या-खिंड्या मला सहन कराव्या लागल्या. गुन्हे दाखल व्हायचे तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पाच-सहा तास, दोन-दोन दिवस झोपलेले. वकिलांचे फी भरण्यासाठी पैसे नसत, तरी संघर्ष करत राहिले.”

त्या पुढे सांगतात लग्नानंतर दुसऱ्या दिवशी प्रभागासाठी काम सुरू केले. त्यांनी शेतकरी-विरुद्ध कारखानदार असा संघर्ष अनुभवला. लग्नानंतर २० ते २३ दिवसांनी काश्मीरात हल्ल्याच्या प्रसंगी सहभागी झाले. त्या प्रसंगी त्यांनी सांगितले की, “रक्तात चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो, महाराष्ट्रातील लोकांना बाहेर काढलं आणि देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला. हा व्हिडिओ एका तासात व्हायरल झाला. दहशतवाद्यांना हिंदू-मुस्लीम विभागायचं होतं. तीन तासानंतर वातावरण बदललं, पण हे अनुभव लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. पक्षाच्या वरच्या लेव्हलवर मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचं विक्टीम मी ठरले. पहलगाम आणि काश्मीरचा हल्ला धर्म विचारून झाला, मात्र ते खालीपर्यंत पोहोचू शकले नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूजा जाधव हिने पत्रकार परिषदेत आपले अनुभव सांगताना सांगितले की, आपल्या आयुष्यातील संघर्ष, शारीरिक आणि मानसिक ताण हे सर्व त्यांनी पक्षासाठी सहन केले असून, भविष्यातही जिथे गरज असेल तिथे काम करणार आहेत.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, पूजा जाधव हिने निवडणुकीसाठी आपला अर्ज मागे घेतला आहे. पत्रकार परिषदेत तिनं आपले अनुभव आणि मनोभाव उघड केले.

पूजा जाधव हिने सांगितले की, “सामान्य घरची मुलं उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. विरोधकांची प्रभागाची टीम आहे, आणि तिची विक्टिम मी ठरले.

त्यांनी आपले व्यक्तिगत आणि राजकीय अनुभवही स्पष्ट केले. पूजा जाधव म्हणाल्या, “विरोधकांनी षडयंत्र रचले. माझ्या पतीला देव मानून, त्यांचे आभार मानते. भाजपकडेही माझे आभार आहेत. ८/१० च्या खोलीत धनंजय जाधव मोठे झाले. सामान्य माणसाचा बळी घेतला जातो. पोस्ट टाकून मुलीचं आयुष्य वाया घालवलं.”

त्यांनी सांगितले की, संघ-परिवाराने तिला समजून घेतले आहे. “मी स्वतः हिंदू आहे. हिंदुत्वासाठी काम करेन. झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज आहे, तिथे मी काम करेन. वाघीण जखमी झाल्यावर ती अजून जोरात काम करते, तसेच मीही काम करते. राजकीय आयुष्य आपलं दोघांचं आहे. माझ्यामुळे तुमच्या राजकीय जीवनाला त्रास झाला असेल, तर मला माफ करा,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शेवटी, पूजा जाधव ह्यांनी सांगितले की, निवडणुकीतून सर्व अर्ज मागे घेतले आहेत आणि भविष्यात पक्षासाठी काम करण्यास नेहमीच तयार राहणार आहेत.

पूजा जाधव ह्यांनी उघडपणे आपल्या अनुभवांबद्दल आणि भावनिक क्षणांबद्दल बोलून, निवडणुकीतून मागे जाण्याचे कारण स्पष्ट केले आहे. आता पाहण्यासारखे आहे की, ही परिस्थिती पक्षाच्या रणनीतीवर आणि आगामी राजकीय निर्णयांवर कसा परिणाम करणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या