Natural Anti Aging Tips : तुमच्या त्वचेचे सौंदर्य केवळ महागड्या क्रिम्सवर अवलंबून नसते, तर तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यावर मोठा परिणाम होतो. आपण उन्हापासून त्वचेचे रक्षण कसे करतो, आहार कसा घेतो आणि तणावाचे नियोजन कसे करतो, यावर त्वचेचा पोत ठरतो.
वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू नये आणि त्वचा दीर्घकाळ जवां राहावी यासाठी खालील 6 सवयी अत्यंत परिणामकारक ठरतात.
तरुण त्वचेसाठी या 6 सवयी करा फॉलो
धु्म्रपान पूर्णपणे बंद करा: धुम्रपानामुळे त्वचेला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे त्वचा अकाली निस्तेज आणि सुरकुतलेली दिसू लागते. धुम्रपान सोडल्यानंतर काही काळातच त्वचेच्या रंगात आणि पोतात सकारात्मक बदल दिसून येतात.
तणावावर नियंत्रण ठेवा: सततचा मानसिक तणाव शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतो, ज्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो. जास्त तणावामुळे त्वचेतील नैसर्गिक लवचिकता कमी होते आणि वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. ध्यानधारणा किंवा छंदांसाठी वेळ दिल्यास त्वचा टवटवीत राहते.
भरपूर पाणी प्या: जर शरीर आतून हायड्रेटेड असेल, तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा पुसल्या जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा अधिक लवचिक आणि चमकदार दिसते.
सनस्क्रीनचा नियमित वापर: उन्हात जाण्यापूर्वी दररोज सनस्क्रीन लावणे ही त्वचेसाठी सर्वात फायदेशीर सवय आहे. सूर्याची अतिनील किरणे त्वचेतील कोलेजन नष्ट करतात, ज्यामुळे सुरकुत्या पडतात. नियमित सनस्क्रीनच्या वापरामुळे त्वचेचे वृद्धत्व रोखण्यास 24 टक्क्यांपर्यंत मदत होऊ शकते.
सौम्य स्किनकेअर उत्पादनांची निवड: त्वचेवर खूप कडक किंवा तीव्र रसायने असलेली उत्पादने वापरणे टाळावे. यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर कमकुवत होतो. त्याऐवजी सौम्य क्लींजर आणि नैसर्गिक घटकांचा समावेश असलेले मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि मऊ राहते.
मद्यपानावर मर्यादा: मद्यपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते आणि त्वचेला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे चेहऱ्याचा आकार सैल पडणे आणि डोळ्यांखाली सूज येणे अशा समस्या उद्भवतात. मद्यपान टाळल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
हे देखील वाचा – नवीन वर्षात खरेदी करा स्वतःची बाईक! फक्त 5,000 रुपयात घरी आणा Hero Splendor Plus; पाहा EMI आणि फीचर्स









