Home / महाराष्ट्र / Kirit Somaiya : नील सोमय्याविरुद्ध ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार नाही; नील सोमय्यांचा विजयी निश्चित, किरीट सोमय्यांनी पोस्ट करत मानले आभार

Kirit Somaiya : नील सोमय्याविरुद्ध ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार नाही; नील सोमय्यांचा विजयी निश्चित, किरीट सोमय्यांनी पोस्ट करत मानले आभार

Kirit Somaiya : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारणात सत्तेसाठी चालणाऱ्या खेळाचे खरे चेहरे पुन्हा एकदा दिसून आले आहेत. युती किंवा...

By: Team Navakal
Kirit Somaiya
Social + WhatsApp CTA

Kirit Somaiya : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारणात सत्तेसाठी चालणाऱ्या खेळाचे खरे चेहरे पुन्हा एकदा दिसून आले आहेत. युती किंवा आघाड्या ज्या तितक्या मजबूत आणि व्यापक संघटनात्मक दाव्यांसह जाहीर होतात, त्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचे अनेकदा अगदी ठळकपणे दर्शन होते.

मुंबईत याचे स्पष्ट उदाहरण पाहायला मिळाले आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या सातत्याने विरोधकांवर अर्थात ठाकरे बंधू शरद पवार यांच्यावर टीका करत आले आहेत. मात्र; आता महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचा विजय सोपा व्हावा यासाठी, उबाठा आणि मनसे या पक्षांनी त्याच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवलाच नाही आहे. या निर्णयामुळे राजकारणातील आघाड्या, युती आणि पक्षांमध्ये व्यक्त होणाऱ्या दुटप्पीपणाचे खरे स्वरूप स्पष्टपणे दिसून आले आहे.

एकीकडे सतत विरोधकांवर टीका करणारे नेते, दुसरीकडे आपल्यासाठी स्वारस्य साधण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने कृती करण्यास मागे हटत नाहीत, हीच निवडणुकीतील राजकीय धोरणाची खरी झलक आहे. मुंबईतील या प्रकरणातून स्पष्ट होते की, निवडणुकीतील युतींमधील धोरणे आणि आघाडीचे निर्णय हे केवळ सत्तेसाठी केले जाणारे खेळ आहेत, जे प्रत्यक्षपणे जनतेच्या निर्णयावर आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम करतात.

भाजपाने मुंबई महापालिकेच्या वार्ड क्रमांक १०७ मधून किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांना उमेदवारी दिली आहे. मुलुंड येथील या वार्डामधून मनसे-उद्धवसेना आणि काँग्रेस पक्षांकडून उमेदवार नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आपला आनंद आवरू शकलेले नाहीत. सोमय्य यांनी स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. याच संदर्भात किरीट सोमय्यांनी आपल्या पोस्टला एक खोचक आणि प्रभावी कॅप्शनही दिले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये “देव महान आहे” असे आशयपूर्ण शब्द वापरून आपला आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमुळे स्पष्ट होते की, नील सोमय्यांसमोर या वार्डामधील प्रमुख राजकीय पक्षांकडून कोणतीही स्पर्धा नाही.

नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या..
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करून माहिती दिली आहे की, मुलुंडमधील वार्ड क्रमांक १०७ मधून त्यांच्या मुलाला, नील सोमय्यांना विरोधकांकडून कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नील सोमय्या यांच्या वार्ड क्रमांक १०७ मधून उद्धव ठाकरे नेतृत्वातील शिवसेना, राज ठाकरे नेतृत्वातील मनसे, शरद पवार नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुल गांधी नेतृत्वातील काँग्रेस यांनी उमेदवारच दिला नाही. देव महान आहे.”

या पोस्टद्वारे सोमय्यांनी स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रियेतील या अनपेक्षित परिस्थितीमुळे त्यांच्या मुला समोर कोणतीही ठळक स्पर्धा उरलेली नाही, आणि त्यामुळे वार्ड क्रमांक १०७ मधून नील सोमय्या यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

या वार्डमधून उद्धव ठाकरे नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरे नेतृत्वातील मनसे यांचा कोणताही उमेदवार उभा राहिला नाही.तर; तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाला काही जागा दिल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धवसेनेची युती असलेल्या भागातील उमेदवारी संदर्भातील नियम पाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरला होता.

नील सोमय्या यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हंसराज दनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत आवश्यक प्रतिज्ञापत्र जोडलेले नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तो अर्ज अवैध ठरवला. परिणामी, नील सोमय्या यांच्याविरोधातील महाविकास आघाडीचे आव्हान संपुष्टात आल्याचे दिसले. सद्यस्थितीत या वार्डमध्ये वंचित बहुजन आघाडीने वैशाली सकपाळ यांना उमेदवारी दिल्यानंतर नील सोमय्या यांचा सामना आता वैशाली सकपाळसह इतर अपक्ष उमेदवारांशी होणार आहे. तथापि, वॉर्ड क्रमांक १०७ मधील सध्याचे राजकीय समीकरण पाहता, नील सोमय्या यांचा विजय सहज साध्य होणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत त्यांच्या पाठींब्याचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे.

नील सोमय्या हे २०१७ साली पहिल्यांदा मुलुंड प्रभाग क्रमांक १०७ मधून महानगरपालिकेत निवडून आले होते. आता ते दुसऱ्यांदा या वॉर्डमधील निवडणुकीला सामोरे जात आहेत. मुलुंड हा भाग परंपरेनुसार भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे गुजराती व मारवाडी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्येही मुलुंडचा मोठा भाग भाजपला साथ देताना दिसतो. त्यामुळे साहजिकच, मुलुंड वॉर्ड क्रमांक १०७ मधील लढतीत नील सोमय्या यांचे पारडे जड मानले जात आहेत.

हे देखील वाचा – नवीन वर्षात खरेदी करा स्वतःची बाईक! फक्त 5,000 रुपयात घरी आणा Hero Splendor Plus; पाहा EMI आणि फीचर्स

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या