Nawab Malik : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्ष तसेच सत्तदारी यांच्यातील टीका सत्र तर सुरूच आहे. आता याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, अनेकजण उत्तर भारतीयांना आपले हक्काचे मतदार समजत आहेत, मात्र आमच्या पक्षाने यंदा जास्त उत्तर भारतीय उमेदवार निवडून दिले आहेत. काही लोक असे वाटते की आमच्या पक्षाचे १४ पेक्षा जास्त उमेदवार निवडून येऊ शकणार नाहीत; मात्र यंदा आमचे अधिक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक म्हणाले, “काहीजण बोंबाबोंब करत होते की, नवाब मलिक असल्यास आम्ही युती करणार नाही. मात्र, अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहण्याचा स्पष्ट संकेत दिला. साडे तीन वर्षांनंतर मैदानात उतरत असलेले नवाब मलिक यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही टीका केली. त्यांनी आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, निवडणुकीच्या व्यवस्थापनात पारदर्शकतेची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवार यादीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईतील ९४ जागांसाठी आमचे उमेदवार आहेत. ९५ व्या जागी नामांकन भरण्यात आले होते, परंतु काही किरकोळ कारणास्तव ते रद्द झाले आहे.
नवाब मलिक यांनी सांगितले की, रमाबाई आंबेडकर मतदारसंघ आणि धारावी मतदारसंघासाठी पक्षाने पुरस्कृत उमेदवार निवडले आहेत. “आमच्या उमेदवारीत सगळ्यात जास्त महिला आहेत. तसेच, मराठी भाषिक आणि या राज्यातील भूमिपुत्रांना आम्ही जास्त संधी दिली आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी यावर भर देत स्पष्ट केले की, “सर्वधर्मीय मतदारांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. आमचा उद्देश सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहोचणे आणि त्यांचे मत मिळवणे हा आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी महापौरपदाच्या निवडणुकीबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “येत्या १६ तारखेला आमचा महापौर होणार आहे. हसू नका, हे शक्य आहे कारण झारखंडमध्ये एका जागेमुळे मुख्यमंत्रीही झाला आहे. ३० जागांमुळे महापौर निश्चित बसणार आहे,” असे मलिक यांनी सांगितले.
नवाब मलिक यांनी आपल्या कुटुंबातील पक्षाशी संबंध स्पष्ट करत सांगितले की, “माझ्या कुटुंबातील एकही उमेदवार नाही. माझी बहिण वेगळ्या कुटुंबातील आहे आणि माझा भवाचा वेगळा कुटुंब आहे. माझा भाऊ आणि बहीण हे आधीचे नगरसेवक आहेत.”
यासोबतच, मलिक यांनी त्यांच्या विरोधकांवर उठलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. त्यांच्या विरोधकांनी मलिक यांच्यावर घराणेशाहीत तीन उमेदवार दिल्याचा आरोप केला होता, परंतु मलिक यांनी त्यावर स्पष्टपणे विरोध केला आणि आरोप निराधार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “निवडणूक निर्णय अधिकारी आपले काम योग्यरित्या करत नाहीत. आमच्या माहितीनुसार, एक उमेदवार कोर्टात गेला असून त्याच्या अर्जाविरुद्ध बेकायदेशीर बांधकामाचा आरोप आहे. भाजप उमेदवाराने केलेल्या या बेकायदेशीर कामाचे पुरावे सादर केले, तरीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिवसभर निर्णय दिला नाही.”
मलिक म्हणाले, “आमची नगरसेविका मनीषा रहाटे यांच्या विरोधात जो उमेदवार आहे, तो महापालिकेचा व्हेंडर आहे आणि त्याला निवडणूक लढता येऊ शकत नाही. तरीही त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तसेच, एक उमेदवार ज्यानं राजस्थानचे जात प्रमाणपत्र जोडले आहे, त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे, परंतु अशा व्यक्तीला मुळात निवडणूक लढवता येत नाही.”
नवाब मलिकांनी आपल्या वक्तव्याला गंभीर स्वरूप दिले आणि सांगितले, “माझा गंभीर आरोप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे समजायला हवे. उद्या आम्ही या प्रकरणी कोर्टात जाणार आहोत.”
त्यांनी अधिक स्पष्ट करत पुढे सांगितले की, “आमचे आक्षेप हे प्रभाग क्रमांक ८७, ११९ आणि १५१ या प्रभागांबाबत आहेत. आम्ही या प्रकरणी योग्य ती कारवाई करणार आहोत. असे स्पष्ट मत यावेळी नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडले.









