PM Kisan 22nd Installment : देशातील अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली PM Kisan सन्मान निधी योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे. आता नवीन वर्ष 2026 सुरू होताच, शेतकऱ्यांचे लक्ष या योजनेच्या 22 व्या हप्त्याकडे लागले आहे.
योजनेअंतर्गत मिळणारी मदत
या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, खते आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या पैशांचा मोठा आधार मिळतो.
22 व्या हप्त्याबाबत ताजी अपडेट
सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. या माध्यमातून जवळपास 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. आता सर्वांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये हा हप्ता जारी होण्याची दाट शक्यता आहे. दर चार महिन्यांनी एक हप्ता देण्याच्या सरकारच्या पद्धतीनुसार ही वेळ जवळ आली आहे, तरीही अद्याप अधिकृत तारखेची घोषणा होणे बाकी आहे.
हप्ता मिळवण्यासाठी ‘ही’ कामे आहेत अनिवार्य
जर तुम्हाला कोणताही अडथळा न येता 22 व्या हप्त्याचे पैसे हवे असतील, तर खालील गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे:
- ई-केवाईसी (e-KYC): तुमच्या खात्याची ई-केवाईसी पूर्ण असणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा सीएससी केंद्रावर जाऊन करता येते.
- आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- भूमी अभिलेख (Land Records): तुमचे जमिनीचे रेकॉर्ड अपडेट आणि अचूक असावेत.
यापैकी कोणतीही अट अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे फेब्रुवारी महिना उजाडण्यापूर्वी आपल्या खात्याची स्थिती तपासून घेणे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरेल.
हे देखील वाचा – केंद्र सरकारचा ‘X’ प्लॅटफॉर्मला 72 तासांचा अल्टीमेटम! Grok AI द्वारे अश्लील फोटो बनवल्याने कारवाईचा बडगा









