IRCTC Dubai Tour : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यकांसाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) एक खास ‘दुबई टूर पॅकेज’ जाहीर केले आहे. या विशेष सहलीचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे की, देशाच्या विविध भागांतील नागरिक एकाच समूहात एकत्र येऊन भारताची सांस्कृतिक विविधता आणि एकता परदेशात प्रदर्शित करतील.
सहलीचा कालावधी आणि खर्च
ही सहल 4 रात्री आणि 5 दिवसांची असून प्रति व्यक्ती 94,730 रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, जयपूर, बेंगळुरू, अहमदाबाद आणि कोची यांसारख्या प्रमुख शहरांमधून पर्यटकांना या सहलीत सहभागी होता येईल.
पॅकेजमध्ये काय काय मिळणार?
- जाण्या-येण्याचे विमान तिकीट.
- 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय.
- व्हिसा खर्च आणि प्रवास विमा.
- सर्व वेळचे जेवण आणि फिरण्यासाठी वातानुकूलित बस.
- डेझर्ट सफारीचा आनंद.
या ठिकाणांना मिळणार भेट
या सहलीमध्ये पर्यटकांना दुबईतील प्रसिद्ध पाम जुमेराह, मिरॅकल गार्डन, बुर्ज अल अरब, गोल्ड आणि स्पाइस सूक (बाजार) पाहता येईल. तसेच जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा येथील ‘लाईट अँड साऊंड शो’चा थरारही अनुभवता येईल. याव्यतिरिक्त अबू धाबीची पूर्ण दिवसाची सफर असेल, ज्यामध्ये भव्य शेख झायेद मशीद आणि मंदिराला भेट दिली जाईल.
बुकिंगची अंतिम तारीख
ज्यांना या दुबई सफारीचा आनंद घ्यायचा आहे, त्यांना 6 जानेवारी 2026 पर्यंत आपले बुकिंग पूर्ण करावे लागेल. आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा कार्यालयातून ही नोंदणी करता येईल.
यासोबतच आयआरसीटीसीने एप्रिल ते जून या कालावधीत युरोपमधील विविध देशांची सफर घडवणारी 13 दिवसांची विशेष सहल देखील जाहीर केली आहे, ज्याची सुरुवात जयपूर येथून होणार आहे.
Source – टपाल सेवेचा 401 वर्षांचा प्रवास संपला! ‘हा’ देश ठरला पत्रव्यवहार बंद करणारा जगातील पहिला देश









