Home / क्रीडा / T20 World Cup 2026: सुरक्षेचे कारण देत बांगलादेशच्या संघाचा भारतात येण्यास नकार; ICC कडे केली ‘ही’ मोठी मागणी

T20 World Cup 2026: सुरक्षेचे कारण देत बांगलादेशच्या संघाचा भारतात येण्यास नकार; ICC कडे केली ‘ही’ मोठी मागणी

T20 World Cup 2026 : पुढील महिन्यात 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश...

By: Team Navakal
T20 World Cup 2026
Social + WhatsApp CTA

T20 World Cup 2026 : पुढील महिन्यात 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सध्याच्या परिस्थितीत आपल्या देशाला भारतात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

रिपोर्टनुसार, दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध आणि सुरक्षेची कारणे देत बांगलादेशने त्यांचे सामने भारताबाहेर हलवण्याची औपचारिक विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंसक निदर्शने आणि एका हिंदू व्यक्तीच्या हत्येनंतर भारतातही त्याचे पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघाला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. या घडामोडींनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तातडीची बैठक बोलावून हा मोठा निर्णय घेतला.

खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खेळाडू, अधिकारी आणि बोर्डाच्या सदस्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सध्या भारतात जे वातावरण आहे, त्यामध्ये संघ सुरक्षितपणे खेळू शकेल असे बोर्डाला वाटत नाही. बांगलादेशचे चार महत्त्वाचे सामने कोलकात्यात 3 आणि मुंबईत 1 अशा ठिकाणी होणार होते. मात्र, आता हे सामने श्रीलंकेत किंवा इतरत्र हलवण्याची मागणी होत आहे.

राजकीय तणावाचे सावट

2024 मध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यापासून बांगलादेशात भारतविरोधी भावना वाढल्या आहेत. तसेच बांगलादेशातील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतरही परिस्थिती अधिक चिघळली आहे. या राजकीय वादाचा फटका आता थेट क्रिकेटला बसताना दिसत आहे. यापूर्वी पाकिस्तानचे सामने देखील सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत हलवण्यात आले आहेत, त्यामुळे आता बांगलादेशच्या बाबतीत आयसीसी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ

या वादाच्या दरम्यान बांगलादेशने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे: लिटन दास (कर्णधार), सैफ हसन, तन्जिद हसन, परवेझ हुसेन इमोन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, नुरुल हसन (यष्टीरक्षक), महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, तास्किन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन आणि शोरिफुल इस्लाम.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या