BMC Election 2026 : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता अत्यंत गाजावाजा सुरु आहे. निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांनी आपापल्या युती अधिक बळकट बनवण्यासाठी साम दाम दंड भेद वापरायला सुरवात केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत. यामध्ये प्रमुख बाब म्हणजे मुंबई महापालिकेसाठी मोठ्या राजकीय ताकदींचा सामना होणार आहे.
राज्यातील २९ महापालिका (BMC Election 2026) निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापलेले आहे. मतदारांपर्यंत आपले संदेश पोहोचवण्यासाठी आता सर्व प्रमुख पक्षांनी प्रचाराची रणनिती अधिकृतपणे सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची ताकद, उमेदवारांची पात्रता आणि शहरातील विकासकामांचा ठसा यावर भर देत प्रचार करत आहे.
युती आणि प्रचाराच्या रणधुमाळीमुळे शहरातील राजकीय रंगभूमी सध्या अतिशय गडद आणि स्पर्धात्मक झालेली आहे. मतदारांकडून मिळणारे प्रतिसाद, प्रचाराची परिणामकारकता आणि पक्षीय रणनीती निवडणुकीच्या निकालावर निर्णायक ठरू शकतात.
राज्यातील २९ महापालिकांच्या (BMC Election 2026) निवडणुकीसाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा, संयुक्त सभासमिती आणि भव्य मेळावे आयोजित केले जाणार आहेत. राज्यभरातील विविध भागांमध्ये राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारकांचा वापर करून प्रचाराची दिशा ठरवत आहेत. काही पक्षांनी आपल्या प्रमुख प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली असून, त्यानुसार प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक पक्ष आपल्या संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन भागानुसार नेत्यांना प्रचारासाठी नेमत आहे. ज्या भागात पक्षाची प्रभावी संघटना अधिक आहे, तिथे त्या पक्षाचे प्रमुख नेते थेट जनतेशी संवाद साधतील. मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता टिकवण्याची आणि महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याची महत्त्वाकांक्षा या सर्व प्रचारधोरणामागील मुख्य कारण ठरत आहे. ठाकरे बंधू स्वतः सक्रिय राहून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रचारयात्रेत शहरातील विविध भागांमध्ये सभा, भेटघाटी आणि स्थानिक समस्या समजून घेण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
याच अनुषंगाने आज ठाकरे बंधू शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रितपणे प्रचार दौरा करणार आहेत. शिवडी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि या भागाला ऐतिहासिक तसेच राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या बालेकिल्ल्यातील मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लालबाग, परळ आणि शिवडी परिसरातील विविध शाखांना भेट देणार आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी प्रचाराची वेगळी आणि लक्षवेधी रणनीती स्वीकारली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर जाहीर सभा घेण्याऐवजी त्यांनी थेट शाखा भेटींवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, या माध्यमातून कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करणे आणि स्थानिक पातळीवरील प्रचार यंत्रणा मजबूत करणे, हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे.
या धोरणानुसार आज ठाकरे बंधू शिवडी विधानसभा मतदारसंघातील शाखा क्रमांक २०२, २०३, २०४, २०५ आणि २०६ यांना भेट देणार आहेत. या भेटींमध्ये ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांशी संवाद साधत प्रचाराची दिशा, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उपाय तसेच मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेणार आहेत.
या शाखा भेटींच्या माध्यमातून शिवडी मतदारसंघातील उमेदवार किरण तावडे, सुप्रिया दळवी, सचिन पडवळ, श्रद्धा जाधव आणि भारती पेडणेकर यांच्या प्रचाराला थेट बळ मिळावे, असा उद्देश आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, शिवडीसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या प्रचार मोहिमेला अधिक गती मिळताना दिसत आहे. शाखा पातळीवर थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणे, आगामी निवडणुकीसाठी स्पष्ट रणनीती मांडणे आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे ठोस संकेत देणे, हा या भेटींचा प्रमुख उद्देश आहे. या शाखा भेटींच्या माध्यमातून संघटनात्मक शिस्त, प्रचारातील समन्वय आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित मुद्दे अधोरेखित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी सक्रिय झाले असून, संघटन बळकट करण्यावर विशेष भर दिला जात आहे. उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे मुंबईतील विविध भागांतील शाखांना भेटी देत असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवत आहेत. या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत एकसंघपणे आणि प्रभावीपणे मैदानात उतरण्याचा निर्धार अधिक ठळकपणे व्यक्त होत आहे. त्यामुळे ही रणनीती निवडणुकीत कितपत प्रभावी ठरणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.या प्रचार मोहिमेच्या प्रारंभिक टप्प्यात शाखा भेटींवर विशेष भर देण्यात आला आहे.
कुठल्या तारखांना होणार प्रचार; नेमकी ठिकाण कोणती?
उद्या, ६ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अंधेरी पूर्व, जोगेश्वरी आणि दिंडोशी विधानसभा क्षेत्रांतील शाखांना भेटी देणार असून, तेथील संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांची तयारी आणि प्रचाराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेणार आहेत. स्थानिक प्रश्न, मतदारांचा कल आणि निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या रणनीतीवरही या भेटींमध्ये चर्चा होणार आहे.
७ जानेवारी रोजी ठाकरे बंधू दादर-माहीम, धारावी, चेंबूर आणि कुर्ला विधानसभा क्षेत्रांतील शाखांना भेट देणार आहेत. या भागांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.
त्यानंतर ८ जानेवारी रोजी वर्सोवा, कलिना आणि गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतील शाखा भेटींचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या शाखा दौर्यातून मुंबईतील संघटनात्मक बांधणीला नवे बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रचाराच्या पुढील टप्प्यात जाहीर सभा आणि संयुक्त सभांना सुरुवात होणार आहे.
९ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नाशिक येथे संयुक्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यानंतर १० जानेवारी रोजी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र जाहीर सभा घेणार आहेत.
प्रचार मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात ११ आणि १२ जानेवारी रोजी ठाणे आणि मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या सभांमधून ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीचे प्रदर्शन होणार असून, महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात या सभांना निर्णायक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच पार्शवभूमीवर काल रात्री उद्धव ठाकरेंनी बोरिवली (पूर्ण) परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार कविता माने यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील प्रश्न, निवडणुकीचे वातावरण आणि मतदारांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील प्रश्न, निवडणूक वातावरण आणि स्थानिक अपेक्षा जाणून घेतल्या.काल रात्री त्यांनी बोरिवली (पूर्ण) परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार कविता माने यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील प्रश्न, निवडणूक वातावरण आणि स्थानिक अपेक्षा जाणून घेतल्या.काल रात्री त्यांनी बोरिवली (पूर्ण) परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार कविता माने यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील प्रश्न, निवडणूक वातावरण आणि स्थानिक अपेक्षा जाणून घेतल्या. घोषणाबाजीमुळे काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि तणाव वाढला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.
दरम्यान काल राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना भवनात उपस्थित राहिल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. आगामी २०२६ मधील मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी एकत्र येत संयुक्त वचननामा जाहीर केला. या घडामोडीमुळे मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे यांचे दीर्घ काळानंतरचे शिवसेना भवनातील पुनरागमन हे केवळ औपचारिक भेट न राहता, राजकीय संकेत देणारे पाऊल ठरले आहे. या ऐतिहासिक इमारतीशी भावनिक आणि राजकीय नाते असलेल्या राज ठाकरे यांचे पुन्हा एकदा येथे आगमन होणे, हे अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे प्रत्यक्षात किती शाखा शिल्लक आहेत? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला –
ठाकरे बंधूंच्या प्रचार दौर्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकात्मक भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, ठाकरे बंधूंच्या सभांना गर्दी होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी त्या गर्दीचे रूपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये होताना दिसत नाही. सभा आणि मेळाव्यांतील उपस्थिती ही निवडणूक निकालांची हमी नसते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
बावनकुळे यांनी पुढे म्हटले की, उद्धव ठाकरे आता प्रत्येक शाखेत जाऊन प्रचार करणार असल्याचे सांगत आहेत, मात्र त्यांच्या पक्षाकडे प्रत्यक्षात किती शाखा शिल्लक आहेत, हा प्रश्नच आहे. बहुतांश शाखा आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे गेल्या असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शाखा भेटींच्या माध्यमातून उभे राहणारे चित्र वास्तवाशी सुसंगत नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा कल आता विकासाच्या दिशेने ठामपणे झुकलेला आहे, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्यात राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा आणि स्थिर सरकारचा जनतेला लाभ होत असल्याने मतदारांचा विश्वास महायुतीवर अधिक दृढ झाला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीलाच स्पष्ट जनादेश मिळेल, असा ठाम दावा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, प्रचाराच्या गाजावाजापेक्षा कामगिरी आणि विकासावर विश्वास ठेवणारी जनता योग्य निर्णय घेईल.
हे देखील वाचा – Umar Khalid : उमर-शरजील जामीनापासून वंचित; उमर -शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा थेट नकार









