Home / लेख / Weight Loss Tips : वजन कमी करणे आता कठीण नाही! ‘या’ 5 सवयींमुळे वर्कआउट होईल मजेशीर आणि रिझल्ट मिळेल जलद

Weight Loss Tips : वजन कमी करणे आता कठीण नाही! ‘या’ 5 सवयींमुळे वर्कआउट होईल मजेशीर आणि रिझल्ट मिळेल जलद

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचे नाव घेतले की अनेकांच्या डोळ्यांसमोर कडक डाएट आणि तासनतास चालणारा कंटाळवाणा व्यायाम येतो....

By: Team Navakal
Weight Loss Tips
Social + WhatsApp CTA

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचे नाव घेतले की अनेकांच्या डोळ्यांसमोर कडक डाएट आणि तासनतास चालणारा कंटाळवाणा व्यायाम येतो. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि धावपळीच्या आयुष्यामुळे लठ्ठपणा ही मोठी समस्या बनली आहे.

अनेकजण उत्साहाने जिम सुरू करतात, पण काही दिवसांतच त्यांचा उत्साह मावळतो. मात्र, वजन घटवण्याचा हा प्रवास जर तुम्ही काही खास सवयींच्या मदतीने मजेशीर बनवला, तर ध्येय गाठणे अधिक सोपे होते.

वजन कमी करण्यासाठी खालील 5 सवयींचा आवर्जून अवलंब करा:

1. वर्कआउट पार्टनर शोधा

व्यायाम करताना जर सोबत कोणी असेल, तर कंटाळा येत नाही. आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्राला व्यायामात सोबत घ्या. जोडीदारासोबत वर्कआउट केल्याने केवळ मजाच येत नाही, तर एकमेकांना पाहून अधिक मेहनत करण्याची जिद्द निर्माण होते.

2. सकारात्मक विचार आणि संवाद

तुमचा मेंदू जसा विचार करतो, तसाच प्रतिसाद तुमचे शरीर देते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेबद्दल नेहमी सकारात्मक विचार करा आणि इतरांशीही त्याबद्दल चांगले बोला. तुमच्या छोट्या सुधारणांबद्दल स्वतःचे कौतुक केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही ध्येयापासून भरकटत नाही.

3. स्वतःला बक्षीस द्यायला शिका

आपल्या यशाचा आनंद साजरा करणे ही सकारात्मकतेची गुरुकिल्ली आहे. समजा तुम्ही आठवड्याचे व्यायामाचे उद्दिष्ट पूर्ण केले, तर स्वतःला एखादा आवडीचा चित्रपट दाखवा किंवा एखादा छोटासा भेटवस्तू द्या. ही रिवॉर्ड सिस्टम तुम्हाला पुढील आठवड्यासाठी अधिक ऊर्जा देते.

4. संगीताची साथ घ्या

शारीरिक हालचाल करताना तुमची आवडती गाणी ऐकल्याने थकवा जाणवत नाही. हाय-बीट गाण्यांची एक खास प्लेलिस्ट तयार करा. संगीतामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तुम्ही जास्त वेळ सक्रिय राहू शकता, ज्यामुळे कॅलरी वेगाने बर्न होतात.

5. छोटी आणि सोपी उद्दिष्टे ठेवा

एकाच वेळी १०-१५ किलो वजन कमी करण्याचे मोठे टार्गेट ठेवण्यापेक्षा छोटे छोटे टप्पे ठरवा. दररोज फक्त 15 ते 20 मिनिटे व्यायाम करणे किंवा आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करण्याचे ध्येय ठेवा. छोटे टार्गेट पूर्ण झाले की मिळणारे समाधान तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाते.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या