IND vs NZ: भारतीय क्रिकेट संघ आजपासून (11 जानेवारी 2026) न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात भारतीय जर्सीमध्ये दिसणार आहेत.
आगामी टी-20 वर्ल्ड कप आणि आयपीएलपूर्वी भारताची ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. टी-20 वर्ल्ड कपकडे सर्वांचे लक्ष असले तरी, आशियाई खेळपट्टीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरेल.
आमनेसामने रेकॉर्ड
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत 120 वेळा भिडले आहेत. यामध्ये भारताचे वर्चस्व दिसून येते:
- भारत विजयी: 62 सामने
- न्यूझीलंड विजयी: 50 सामने
- टाय/निकाल नाही: 8 सामने
- भारतात खेळताना टीम इंडियाने 31 सामने जिंकले असून केवळ 8 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
मालिकेचे वेळापत्रक (Schedule)
| तारीख | ठिकाण | स्टेडियम | वेळ (IST) |
| 11 जानेवारी 2026 | वडोदरा | बीसीए स्टेडियम, कोटंबी | दुपारी 1:30 |
| 14 जानेवारी 2026 | राजकोट | निरंजन शाह स्टेडियम | दुपारी 1:30 |
| 18 जानेवारी 2026 | इंदूर | होळकर क्रिकेट स्टेडियम | दुपारी 1:30 |
भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.
न्यूझीलंड संघ:
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हन कॉनवे, झाक फॉल्क्स, मिच हाय (यष्टीरक्षक), काइल जेमिसन, निक केली, जयडेन लेनॉक्स, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
भारत आणि न्यूझीलंडमधील या मालिकेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येतील. तसेच मोबाईलवर जिओ हॉटस्टार (JioHotstar) अॅप आणि वेबसाईटवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दुपारी 1:30 वाजल्यापासून उपलब्ध असेल.
हे देखील वाचा – BMC Election : “मुंबई महाराष्ट्राची नाही!” भाजप नेते अण्णामलाईंच्या विधानाने राजकारण पेटले









