Home / देश-विदेश / Pakistani Boat Seized: अरबी समुद्रात मोठी कारवाई! तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानी बोट; 9 घुसखोरांना घेतलं ताब्यात

Pakistani Boat Seized: अरबी समुद्रात मोठी कारवाई! तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानी बोट; 9 घुसखोरांना घेतलं ताब्यात

Pakistani Boat Seized: भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गुजरात किनारपट्टीवर अरबी समुद्रात एक मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ...

By: Team Navakal
Pakistani Boat Seized
Social + WhatsApp CTA

Pakistani Boat Seized: भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गुजरात किनारपट्टीवर अरबी समुद्रात एक मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ गस्त घालत असताना तटरक्षक दलाने एका पाकिस्तानी मासेमारी बोटीला भारतीय जलसीमेत पकडले आहे.

या बोटीमध्ये 9 कर्मचारी असून त्यांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले आहे.

वेगवान कारवाई आणि थरार

मिळालेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलाच्या जहाजाने गस्त घालत असताना ‘अल-मदिना’ नावाची पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत दिसली. तटरक्षक दलाने या बोटीला थांबण्याचा इशारा दिला असता, बोटीवरील खलाशांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपली बोट पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने वळवली, मात्र भारतीय जवानांनी अत्यंत चपळाईने या बोटीचा पाठलाग करून तिला घेरले आणि भारतीय जलसीमेतच रोखले.

सखोल चौकशी सुरू

पकडण्यात आलेल्या बोटीवर एकूण 9 पाकिस्तानी खलाशी आहेत. या बोटीला आता ओढत पोरबंदर बंदरात आणले जात आहे. तिथे पोहोचल्यानंतर विविध सुरक्षा यंत्रणांमार्फत या खलाशांची संयुक्त चौकशी केली जाईल. ही बोट नेमकी कोणत्या उद्देशाने भारतीय हद्दीत आली होती आणि बोटीवर काही संशयास्पद साहित्य आहे का, याचा कसून तपास केला जाणार आहे.

सागरी सीमा सुरक्षेसाठी कडेकोट पहारा

गुजरातचा संरक्षण पीआरओ विंग कमांडर अभिषेक कुमार तिवारी यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे. भारतीय सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तटरक्षक दल सातत्याने सतर्क असते, याचेच हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी तटरक्षक दलाची ही विशेष मोहीम सुरूच राहणार आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या