Home / महाराष्ट्र / Mumbai Mayor Full List : आतापर्यंत ‘या’ दिग्गजांनी भूषवले आहे मुंबईचे महापौर पद, पाहा संपूर्ण यादी

Mumbai Mayor Full List : आतापर्यंत ‘या’ दिग्गजांनी भूषवले आहे मुंबईचे महापौर पद, पाहा संपूर्ण यादी

Mumbai Mayor Full List : मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापौर पद हे अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. १९३१ मध्ये या...

By: Team Navakal
Mumbai Mayor Full List
Social + WhatsApp CTA

Mumbai Mayor Full List : मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापौर पद हे अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. १९३१ मध्ये या पदाची निर्मिती झाल्यापासून आजवर अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी या खुर्चीवर बसून मुंबईचे नेतृत्व केले आहे. आज २९ महापालिकांचे निकाल लागत असताना, मुंबईच्या जुन्या महापौरांची ही नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

मुंबईच्या महापौरांची संपूर्ण यादी (१९३१ – २०२२)

वर्षमहापौरांचे नाव
1931 – 1932सर जे. बी. बोमन-बेहराम
1932 – 1933सर व्ही. एन. चंदावरकर
1933 – 1934डॉ. एम. सी. जावळे
1934 – 1935श्री. एच. एम. रहिमतुल्ला
1935 – 1936श्री. के. एफ. नरीमन
1936 – 1937श्री. जे. एम. मेहता
1937 – 1938डॉ. ई. मोझेस
1938 – 1939सर एस. एम. चिनॉय
1939 – 1940सर बी. एन. करंजीया
1940 – 1941श्री. एम. त्रिकमजी
1941 – 1942डॉ. जे. ए. कोलॅको
1942 – 1943श्री. वाय. जे. मेहेरअली
1943 – 1943श्री. एम. डी. डी. गिल्डर
1943 – 1944श्री. एम. आर. मसानी
1944 – 1945श्री. एन. टी. मास्टर
1945 – 1946डॉ. जे. ए. डिसोजा
1946 – 1947श्री. एम. आय. एम. रावजी
1947 – 1948श्री. ए. पी. सबावाला
1948 – 1949डॉ. एम. यु. मस्कारेन्हास
1949 – 1952श्री. एस. के. पाटील
1952 – 1953श्री. जी. एन. देसाई
1953 – 1954डॉ. पीटर एनास्टीसिओ डायस
1954 – 1955श्री. डी. व्ही. पटेल
1955 – 1956श्री. एन. सी. पुपाला
1956 – 1956श्रीमती सुलोचना एम. मोदी
1956 – 1957श्री. एस. ए. कदार
1957 – 1957डॉ. एस. सी. फर्नांडिस
1957 – 1958श्री. एम. व्ही. दोंदे
1958 – 1959श्री. एस. एस. मिरजकर
1959 – 1960डॉ. पी. टी. बोराळे
1960 – 1961श्री. व्ही. एन. देसाई
1961 – 1962श्री. व्ही. बी. वरळीकर
1962 – 1963डॉ. एन. एन. शाह
1963 – 1964श्री. ई. ए. बंदुकवाला
1964 – 1965डॉ. बी. पी. दिवगी
1965 – 1966श्री. एम. माधवन
1966 – 1967श्री. एस. आर. पाटकर
1967 – 1968डॉ. जे. एल. डिसोजा
1968 – 1969डॉ. आर. एन. कुलकर्णी
1969 – 1970श्री. जे. के. जोशी
1970 – 1971डॉ. एस. जी. पटेल
1971 – 1972डॉ. एच. एस. गुप्ते (शिवसेना – पहिले मराठी महापौर)
1972 – 1973श्री. आर. के. गणात्रा
1973 – 1974श्री. सुधीर जोशी (शिवसेना)
1974 – 1975श्री. बी. के. बोमन-बेहराम
1975 – 1976श्री. एन. डी. मेहता
1976 – 1977श्री. मनोहर जोशी (शिवसेना)
1977 – 1978श्री. मुरली देवरा (काँग्रेस)
1978 – 1978श्री. वामनराव महाडीक (शिवसेना)
1978 – 1980श्री. आर. के. चिंबुलकर
1980 – 1981श्री. बाबूराव एच. शेटे
1981 – 1982डॉ. ए. यु. मेमन
1982 – 1983डॉ. पी. एस. पै
1983 – 1984श्री. एम. एच. बेदी
1985 – 1986श्री. छगन भुजबळ (शिवसेना)
1986 – 1987श्री. दत्ताजी नलावडे (शिवसेना)
1987 – 1988डॉ. रमेश प्रभू (शिवसेना)
1988 – 1989श्री. सी. एस. पडवळ (शिवसेना)
1989 – 1990श्री. शरद आचार्य (शिवसेना)
1990 – 1991श्री. छगन भुजबळ (शिवसेना – दुसऱ्यांदा)
1991 – 1992श्री. दिवाकर रावते (शिवसेना)
1992 – 1993श्री. चंद्रकांत हांडोरे (आरपीआय)
1993 – 1994श्री. आर. आर. सिंह (काँग्रेस)
1994 – 1995श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर (काँग्रेस)
1995 – 1996श्री. आर. टी. कदम (काँग्रेस)
1996 – 1997श्री. मिलिंद वैद्य (शिवसेना)
1997 – 1998श्रीमती विशाखा राऊत (शिवसेना)
1998 – 1999श्री. नंदू साटम (शिवसेना)
1999 – 2002श्री. हरेश्वर पाटील (शिवसेना)
2002 – 2005श्री. महादेव देवळे (शिवसेना)
2005 – 2007श्री. दत्ताजी दळवी (शिवसेना)
2007 – 2009डॉ. शुभा राऊळ (शिवसेना)
2009 – 2012सौ. श्रद्धा जाधव (शिवसेना)
2012 – 2014श्री. सुनील प्रभू (शिवसेना)
2014 – 2017श्रीमती स्नेहल आंबेकर (शिवसेना)
2017 – 2019प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
2019 – 2022किशोरी पेडणेकर (शिवसेना)

२०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली होती. आजच्या निकालानंतर मुंबईला ९६ व्या वर्षातील नवीन महापौर मिळेल.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या