Municipal Election 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आपली पकड मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे.
महायुतीच्या या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. मोदींनी या निकालांना ‘सुशासनाचा विजय’ असे संबोधले असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचेही कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्विट: “महाराष्ट्राचे आभार!”
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा आणि राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.”
महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना…
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2026
कार्यकर्त्यांचे मानले आभार
केवळ जनतेचेच नाही, तर मोदींनी मैदानात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही पाठ थोपटली आहे. “महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा,” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रतिष्ठेच्या महापालिकांमध्ये महायुतीने घेतलेली आघाडी ही आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.









