Home / महाराष्ट्र / Maharashtra Municipal Corporation Winner List : 29 शहरांचा फैसला! बहुतांश महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा; पाहा कुठे कोणाची सत्ता ?

Maharashtra Municipal Corporation Winner List : 29 शहरांचा फैसला! बहुतांश महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा; पाहा कुठे कोणाची सत्ता ?

Maharashtra Municipal Corporation Winner List : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. या...

By: Team Navakal
Maharashtra Municipal Corporation Winner List
Social + WhatsApp CTA

Maharashtra Municipal Corporation Winner List : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई वगळता उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांमध्ये ‘बहुसदस्यीय प्रभाग रचना’ राबवण्यात आली होती. यामध्ये बहुतांश प्रभाग ४ सदस्यीय होते, तर काही ठिकाणी ३ आणि ५ सदस्यांचे प्रभाग पाहायला मिळाले.

या निकालांमधून राज्याच्या शहरी मतदारांचा कल स्पष्ट झाला असून महायुतीने बहुतांश ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

२९ महानगरपालिका: कोणाची येणार सत्ता?

हाती आलेल्या निकालांनुसार, कोणत्या शहरात कोणाचे पारडे जड आहे आणि कोणाची सत्ता येण्याची शक्यता आहे, याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:

क्र.महानगरपालिकाएकूण जागासत्तेचे चित्र / कोणाचे वर्चस्व?
1बृहन्मुंबई227भाजप-शिवसेना (शिंदे) आघाडीवर
2भिवंडी-निजामपूर90काँग्रेस
3नागपूर151भाजप
4पुणे162भाजप
5ठाणे131शिवसेना (शिंदे) – भाजप
6अहिल्यानगर68भाजप – राष्ट्रवादी (अजित पवार)
7नाशिक122भाजप
8पिंपरी-चिंचवड128भाजप
9छत्रपती संभाजीनगर113भाजप
10वसई-विरार115बहुजन विकास आघाडी
11कल्याण-डोंबिवली122भाजप-शिवसेना (शिंदे) आघाडीवर
12नवी मुंबई111भाजप आघाडीवर
13अकोला80भाजप
14अमरावती87भाजप – राष्ट्रवादी (अजित पवार)
15लातूर70काँग्रेस – वंचित बहुजन आघाडी
16नांदेड-वाघाळा81भाजप
17मीरा-भाईंदर96भाजप
18उल्हासनगर78
19चंद्रपूर66काँग्रेस
20धुळे74भाजप
21जळगाव75भाजप
22मालेगाव84
23कोल्हापूर92महायुती
24सांगली-मिरज-कुपवाड78महायुती
25सोलापूर113भाजप
26इचलकरंजी76भाजप
27जालना65भाजप
28पनवेल78भाजप आघाडीवर
29परभणी65शिवसेना (UBT) – काँग्रेस
Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या